वाट त्याची पाहतो...

वाट त्याची पाहतो...

डोळ्यात प्राण आणुन

वाट त्याची पाहतो

ढगांतुन बरसण्याऐवजी

तो डोळ्यातुन वाहतो

नुसतेच उठवतो काहुर

रोज सांज-सकाळी

निघुन जातो दुर

निकडीच्या वेळी

कोरडे ठाक झाले

उरले सुरले डोह

जगणे असह्य झाले

तरी सुटेना मोह

चारा पाण्यावाचुन

तडफडतात मुके जीव

चित्र विदारक पाहुन

तरी येईना किव

त्याचे नाही चुकले

आपणच पळविले त्याला

नष्ट करुन जंगले

घरे बांधली स्वत:ला

झाडे झुडपे तोडुन

रस्ते केले रुंद

त्याने पाहिले आडुन

येणे केले बंद

किरण क्षीरसागर, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com