प्रतीक्षा

प्रतीक्षा

जीवनातील काही क्षण हवेहवेसे वाटतात...

ना नात्याची ना गोत्याची माणसे एकत्र भेटतात...

काही लोभी तर काही लुच्चे आसतात.

काही सोज्वळ तर काही प्रेमळ असतात.

काही जीव घेणारी असतात तर काही...

जीवास जीव देणारी असतात...

तर काही तटस्थ राहणारी असतात...

तर काही नुसतीच गोड बोलणारी असतात.

पन काही अशीही असतात जी जीव लावून जातात.

असाच माझ्या जीवनात अचानक तू आलास...

आणि माझ्या रुक्ष जीवनास जिवंत करून गेलास...

तू बहार आणलीस माझ्या जीवनात...

बहरून गेले मी तुझ्या सान्निध्यात...

तहान भूक हरपून गेले.

ध्यास होता फक्त तुझाच.

नाही पर्वा केली कुणाची...

वाटले हक्क आहे तुझ्यावर फक्त माझाच...

पण अचानक तू निघून गेलास काहीही न सांगता...

काहीही न विचारताच...

कशासाठी आलास तू माझ्या जीवनात?

काय साधलेस तू मला टाकून

परत एकांतात?

जसा अचानक आलास तसाच

भुर्रकन निघूनही गेलास...

पण जाता जाता मात्र

माझा जीव घेऊन गेलास...

तरीही आहे अजूनही तूझ्या प्रतीक्षेत मी.

सांग केव्हा भेटणार आहेस...

असलेली तुझ्या भेटीची प्रतीक्षा

केव्हा संपणार आहे?

डॉ. अनिता बेंडाळे, गणेश नगर, नासिक.

मो. नं. ७८८७८८३३०३

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com