मायमातीच्या कुशीत

मायमातीच्या कुशीत

मायमातीच्या कुशीत

अशी पुण्याई कोणती

याचे उत्तर शोधती

सारी माणसे जाणती

बीज एकले पेरता

माझी ओंजळ भरते

माझी ओंजळ भरून

दान झोळीत उरते

मायमातीच्या कुशीत

आहे अनोखी किमया

अशी सहज पोसते

साऱ्या सृष्टीस लीलया

तिच्या मायेच्या कुशीत

जन्म अवघा सरावा

पुन्हा तिच्याच कुशीत

जन्म नवीन मिळावा

कवी चंद्रकांत वानखेडे, पुणे

9011372023

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com