फुलदाणी

फुलदाणी

फुलदाणीत ठेवण्यासाठी

आणलेली फुलं

प्रयत्नपूर्वक राहतात

चार-आठ दिवस

ताजी टवटवीत, आणि मग

सुकत-सुकत जातात

दिवसांगणिक.

प्रत्येक दिवसाचंही

असंच असतं, बायकांसाठी !

सकाळी-सकाळी,

कामाच्या रटरटीत

होऊन जातात

सतराशेसाठ कामं,

आपल्या हातून,

आणि

दिवस कलू लागला, की

आपणही होत जातो

त्या सुकणाऱ्या फुलांसारखेच

हमखास मलूल .

फरक एवढाच, की

फुलदाणीतली फुलं

येतात बदलता, हवी तेव्हा.

आपलं मात्र तसं नसतं

इच्छा असो वा नसो

आपल्याला व्हावच लागतं

घरकामांसाठी तयार

दररोज सकाळी

.. आयुष्यभर !

संसार नावाची फुलदाणी

सतत छान ,शोभिवंत

दिसावी म्हणून..!

- मनीषा कुलकर्णी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com