थांब वाऱ्या...

थांब वाऱ्या...

थांब वाऱ्या.....

थांब वाऱ्या कसली घाई

किती रे अवखळपणा

डोंगरदरी नि कडेकपारी

सांग शोधिसी कुणा....

पात्यावरल्या दवबिंदूना

तुझी रे वाटते भीती

चाहूल जराशी लागता

तोल सावरती किती....

फांदीफांदी किती झुलवितो

का उगाच त्यांना छेडी

कि तू कान्हा त्या गौळणी

म्हणुनी काढीतो खोडी?....

शांत तळ्याला भिडतो जाऊन

थरथरती त्या सावल्या

होत्या थांबल्या पाण्यावर

घडीभराच्या विसाव्याला....

गंध फुलांचा दूर नेऊनि

सांग कुठे सोडितो

मृदगंधाने आसमंतही

धरणीशी जोडितो....

वंदना गांगुर्डे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com