दीपावली

दीपावली

एक दीप लावावा

तुळशी वृंदावनात

ज्योतीर्मय प्रकाश

उजळेल मनामनात

तेजाळता समई

देवाच्या गाभाऱ्यात

भावभक्तिचा फुलोरा

पंचप्राणाच्या वातीत

एक दीप लाव

गाईच्या गोठ्यात

भूतदयेचा भाव

रुजू दे जनमानसात

एक दीप तेवूदे

पिंपळाच्या पारावर

वसा वृक्ष संगोपनाचा

सृष्टी होईल हिरवीगार

एक दीप तळपू दे

नदीच्या तीरावर

ध्यास घे स्वच्छतेचा

निर्मळ होईल परिसर

ज्ञानाचा दिवा

लावा शाळेत

प्रकाश झिरपू दे

विद्यार्थी जीवनात

एक दीप लावा

वंचितांच्या दारी

उजळेल घर

घडे पंढरीची वारी

दिव्याने दिवा पेटता

उजळेल घर दार

प्रकाशाचे बेट होऊन

दूर करावा अंधःकार

सुरेखा कुळकर्णी , वसई .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com