पुरुषार्थ नको करू सिध्द
स्रीत्वाचा राख मान गं....
स्री जन्माचा करूनी सोहळा
प्रत्येक स्रीचा कर सन्मान गं.....
सौंदर्य अन् माया ममतेची
तू अलौकिक खाण गं....
माहेर प्रमाणेच सासरला ही
दे तू प्रेमाचे दान गं ....
नको लावु लांछन स्री वर
तू ही एक स्री याचे ठेव भान गं...
करू नको गर्व कधीही कशाचा
हास्य आनंदाचे दे तू वाण गं ...
स्रीभ्रूण हत्येला करूनी विरोध
कळीला उदरात दे तू स्थान गं....
लेकी प्रमाणेच सुनेला ही
दे उडण्या मोकळे रान गं ....
वासनांध नराधमांचे आता
दुर्गा बनुनी घे तू प्राण गं...
जपुनी टाक पाऊल थोडे
सभोवार सारे श्वान गं.....
प्रतिभा खैरनार, नांदगाव. जि. नाशिक