'Lockdown' काही गमावले आणि काही मिळवले....

'Lockdown' काही गमावले आणि काही मिळवले....
Lockdown

"Lockdown"

काही गमावले आणि काही मिळवले

सक्तीचा आराम मिळाला

घरच्यांची सोबत मिळाली

स्वतःला समजायला वेळ मिळाला

रोजच्या धावपळीतून निवांत मिळाला

Work from home & Work for home

दोन्ही संभाळतांना मात्र तारांबळ उडाली..

नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली

आळशीपणा मध्ये राहण्याची सवय लागून गेली

माणसं जवळ आली आणि माणसं लांब पण गेली

कोणी आपले झाले तर कोणी आपले दूर गेले

स्वतःची काम स्वतःच करायला लागल्याने

स्वावलंबीपणाची परत एकदा ओळख झाली

एकटेपणा सोबत जगायची पण हिम्मत मिळाली

शेवटी आपणच आपले सोबती ह्याची जाणीव झाली

काही माणसं मनातून खचली

काहींना कोणाची सोबत मिळाली

कोणी एकटेपणा वर मात केली

काहींना मानसोपचारांची मदत लागली

वेळेची, तब्बेतीची आणि

माणसांची किंमत समजली

Online च्या युगात

दुराव्याची जाणीव झाली

Social distancing जपत जपत

Emotionally मात्र attached झाली

माणसांना लागते माणसांचीच गरज

ह्याची परत एकदा अनुभूती आली

निसर्गासमोर आपण शुल्लक

ह्याची जाणीव नक्की झाली

माणसं जगली, बरी झाली

काहीं मात्र सोडून गेली...

डॉक्टर्स , नर्सेस, पोलीस

सर्वांनीच जीवाची पराकाष्ठा केली

माणसांनी सुरू केलेल्या महायुद्धात

माणसांचीच खूप हानी झाली

एका इतकुशा virus ने मात्र

सर्व जगाची परिक्षा पाहिली

आयुष्य किती क्षणभंगूर आहे

ह्याची आपल्याला जाणीव करून दिली

सर्वांच्या कायम लक्ष्यात राहतील

Lockdown च्या आठवणी मनात राहतील

- ज्योती गंधगोळे-आगाशे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com