आई-बाबा

आई-बाबा

आई-बाबा

आई असते चैतन्याची,

आनंदाची मूर्ती

जशी देवघरातील मंद

पण प्रखर ज्योत

अन् बाबा म्हणजे लेकीसाठी

तिच्या जीवनातील

पहिला आदर्श पुरुष

आई म्हणजे घराचे घरपण,

घराचे हास्य

तर बाबा म्हणजे

घराचा असतात कणा

जो प्रत्येक प्रसंगात

न वाकता न रडता

भार झेलत राहतो खंबीरपणे

आईचा प्रेमळ हात म्हणजे

तिच्या हळव्या मायेची ऊब

बाबांचा डोक्यावरील हात

म्हणजे सुरक्षिततेची हमी

लेक सासरी जाताना

आई गळ्यात पडून रडते...

बाबा मात्र हळूच डोळ्याच्या

कोपऱ्यातून अश्रू पुसत राहतात

असे माझे आई-बाबा

घराचे खरे आधारस्तंभ

त्यांच्या सावलीत झाले माझे

जीवन सुंदर सुलभ....

© सौ.गौरी ए.शिरसाट

Related Stories

No stories found.