भासांचा तरंग

भासांचा तरंग

कान्हा कदंबाच्या आड

पाबळाच्या गारव्यात

राधा कावरी बावरी

बासरीच्या माराव्यात |

राधा आतला कल्लोळ

विरहाच्या वाटेवर

कान्हा भासांचा तरंग

कालिंदीच्या पाण्यावर |

नाही माहीत कोणात

रास वृंदावनी चाले

एक ओढणी नि शेला

धुंद चांदण्यात हाले |

-----------------

काशिनाथ गवळी, नांदगाव नाशिक

९८५०४४१२८७

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com