आई तू संस्कारांची शिदोरी गं

आई तू संस्कारांची शिदोरी गं

बांधल्यात स्वर्गातच आई

या ऋणानुबंधाच्या गाठी

पुजिते परमेश्वराला नित्य

तुच माय मिळण्यासाठी

जन्मापासून दिलीस आई

तूच सुसंस्कारांची शिदोरी

तरले आजवर मी सुखात

टिकुनी आयुष्याची दोरी

बालपणापासूनी होती तुझी

सद्विचारांची सदा शिकवण

भरकटले कधी जीवन माझे

झाली मला तुझीच आठवण

यशोशिखरावर चढता मज

बांधिले घट्ट प्रेमळ धाग्याने

उपदेशाचे डोस पाजताना

चिडायचे संतापून त्राग्याने

कळतेय मला त्याची महती

आज तुझ्यात्या संस्कारांची

शिकवीन माझ्या लेकरांना

पुरवूनी भावना सदाचाराची

तुझ्या कसोटीला उतरलेय

सांग होऊ कशी मी उतराई

भाग्यवान मी या जन्मांतच

धाडली ईश्वराने तुला आई

भारती दिलीप सावंत, फोन 9653445835

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com