कविता # आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे...

कविता # आयुष्याशी अजून माझा 
 करार बाकी आहे...

प्रा. वंदना पाटील

आयुष्याशी अजून माझा

करार बाकी आहे...

मावळताना लखलखण्याचा

विचार बाकी आहे.....

आयुष्याची सकाळ तर सुंदरच गेली...

आणि संध्येची मज फिकीर नाही...

अजून तडफडती दुपार बाकी आहे...

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे..

अनेक संकटे येतात आणि जातात.....

त्यांना मी दिली करून मोकळी वाट आहे...

कदाचित.... येणार्‍या संकटांमुळेच

माझा कणा ताठ आहे...

मी हिमालयासारखी उंच .....

सह्याद्री सारखी कणखर आहे...

जा.... जाऊन सांगा त्या वादळाला

येऊन भेट माझ्याशी गाठ आहे....

अजून संकटांशी माझी झुंज बाकी आहे...

आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे..

नसते कुणी कुणाचे हे जरी सत्य आहे...

पोखरणारे क्षणाक्षणाला आपलेच गद्दार आहे....

आपल्याशी मज परवा नाही...

श्वास असेपर्यंत मित्रांची सोबत बाकी आहे...

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे...

..... म्हणते वंदू ... सरनावरती जाईन आनंदाने.,..

पण अजून मृत्यूचा नकार बाकी आहे....

फाटक आले आयुष्य तरी....

अजून भरजरी किनार बाकी आहे...

आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे..

आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे...

करार बाकी आहे...

प्रा. वंदना पाटील

नूतन मराठा महाविद्यालय ,जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com