विसावा

विसावा

सौ. भावना काळे

आयुष्याच्या वाटेवर

क्षणभर घे, रे! विसावा

नको धावू भौतिक सुखा

भासे वरवरचा गिलावा

जन्म दिला माय-बापांनी

लेकरास वाढविले कष्टाने

भाकरीच्या चवीसाठी

घाम गाळला शरीराने

पोटच्या पोरांस शिकवता

जीवाने केले काबाड-कष्ट

नसे अंगास नीट कापड

पुरविले त्यानेच सारेच हट्ट

ना केली रे हौस-मौज

ना धरली वाईट-संगत

ना पकडली बिडी, तंबाखू

ना पाहिली चित्रपटातील

गमंत

सारे आयुष्य धावपळीत सरले

नाही घेतला कधीच विसावा

शेवटीची मरण घटिका भरता

वाटे सर्वास,फक्त श्वासच उरावा

आप्त-स्वजन धावून आले

निरोप द्यायला अखेरचा

तिरडी उचलून स्माशानभूमीत

विसावा घेतला,कट्टयावरचा

सौ. भावना काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com