नात्यांची वीण..

नात्यांची वीण..

शरद पाटील

निर्मळ नातं

रेशमी धाग्याचं,

एकात एक धागा

आपलेपनाने विण्याचं..

अविश्वसनीय तेच

आदर्श वाटचालीचं,

नात जपाव जे

आपुलकी जिव्हाळयाचं..

पारखुन समजून

मधाळ गोडव्याचं,

नात मानुसकीचं

घट्ट मनी रूजन्याचं..

नात अपरिमित असाव

आपल्या गोतावळयाचं,

समजूतदारपने सार्‍यांनी

अधिक दृढ करत राहण्याचं..

नात असतच मुळी

आकृती बंधाचं,

नात्यांची वीण ही

जीवनभर टिकवण्याचं..

शरद पाटील,

मुसळी, ता. धरणगाव, जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com