नीज नाही चांदण्याच्या अंगणी

नीज नाही चांदण्याच्या अंगणी

डॉ. संगीता म्हसकर

नीज नाही चांदण्याच्या अंगणी बिलकूल आता

वाहत्या वा-यात आली ही तुझी चाहूल आता..

थांबलेली वादळे अन् शांत झालेल्या दिशा या

घातली माझ्या मनाला आगळी तू भूल आता..

हस्तरेषा रेखती बघ चित्र माझ्या कल्पनांचे..

सर्व तारे होत गेले केवढे अनुकूल आता..

जागणारी रात्र आणिक, स्वप्न ही ओथंबलेले..

बघ तुझ्यासाठी पुन्हा हे थांबले पाऊल आता..

वाटते मजला कितीदा घेतले आभाळ हाती..

ओळखीची होत गेली ही यशाची हूल आता..

डॉ. संगीता म्हसकर

पुणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com