'ति'ची गाथा...

'ति'ची गाथा...

समाज पिंजऱ्यातुन आज मी विहरते.

बळ भरलेले पंख मी जगी मिरवते.

चार भिंतिच्या स्वप्नात मी न रमले.

चुल मुल च्या पलीकडे जगी विस्तारले

कर्तुत्वाच्या रुपाने भुवर थाटले.

भरारीच्या कल्पनेने मी अंतरिक्ष गाठले.

घर कारभारणीच्या मुकुटाची मी न प्रतिमा.

देश भार वाहते ती मी राजकारणी प्रतिभा.

धुडकावले पारतंत्र्याला, दिला स्वधर्म जगास.

स्वातंत्र्याचे सूर वाद वदती तो जिजाऊंचा मी ध्यास

घातले अज्ञानाला पांघरूण लावला शिक्षणाचा लळा.

स्त्री शिक्षणाचे धडे गिरवी ती मी सावित्रींची शाळा.

कधी मायेचा सागर ती, कधी धाटते रणांगणाचा संहार.

जगी जन्मदात्री ती, कधी नटवते घराचा संसार.

जीवनाच्या तुझ्या दर पैलूंची वदावी कशी ही महिमा.

जगी जगतास बळ देई ' तिची ' उंबरठ्यापलिकडची गरिमा.

- रेवती बडगुजर, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com