धनत्रयोदशी

धनत्रयोदशी

आश्विन वद्य त्रयोदशी

म्हणेतया धनत्रयोदशी

लक्ष्मीस मानूनि आई

पूजन करी या दिवशी

देवतांचा वैद्य धन्वंतरी

जयंती ती या दिवशी

सुआरोग्य लाभो सर्वां

अमृत असे त्या कलशी

कणीकदीप तेरा लावी

तोंड करावे दक्षिणेशी

यम दीप दाना महत्त्व

अपमृत्यू न ये कुणासी

मुहूर्ता असे मान खूप

व्यापारी पाहे रोजनिशी

किती सुख किती दु:ख

तपासतो तो जमा राशी

इप्सित ती लाभो खुशी

आनंद मिळे सकळाशी

निमित्ताने दिपावलीच्या

शुभेच्छांच्या बरसे राशी

सण आहे निमित्तमात्र

माणूस हो एकजिनसी

धर्म अर्थ शास्त्र सांगड

भले असूद्या भिन्न मुशी

- हेमंत मुसरीफ पुणे (9730306996)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com