
मृदु मधूर मंद चंद्रकिरणांत
सचैल चंद्रस्नान अमृतात झाले
काया ही चमचम चंदेरी रुपेरी
चंद्रकिरणातील अमृत मी प्यायले
चंद्रासवे हलके हलके झुलतांना
शारदीय चांदण्यात बेभान मोहरले.
चंद्रासवे प्रणय गीत गातांना
चंद्रप्रीतीत धुंद चंद्रप्रिया झाले.
नजरेत चंद्र ,चंद्रावर नजर
चंद्र रश्मी रोमरोमी समावले.
पूर्ण चंद्रात चंद्रबिंबात समावून
चांदप्रीतीत चंद्राची चांदणी झाले
मीना खोंड
7799564212