उजळल्या दाही दिशा कोट्यावधी दिव्यांनी

उजळल्या दाही दिशा कोट्यावधी दिव्यांनी

II कार्तिकच्या सोनेरी पहाटेच्या समयी आली

दिवाळी सोन्याच्या पावलांनी

उजळल्या दाही दिशा कोट्यावधी दिव्यांनी ,

II लखलखता प्रकाश सुखावतो नयनी,

आली दिवाळी सोनियाच्या पावलांनी...

II आसमंत दुमदुमला फटाक्यांच्या आतषबाजीने,

घराला आली शोभा आकाश कंदीलामुळे,

II रंगीत रांगोळी सजली दारापुढे

चमचमते तारे हे फिके पडू लागले तिच्यापुढे...

II दिवाळीच्या फराळाचे चवच न्यारी

हसतात झेंडूच्या माळी दारावरी

II अभ्यंग स्नानाचा सुगंध सर्वत्र

लहान थोरांचा हा सण आवडीचा मात्र...

II लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाह्याबत्ताश्यांचा नैवेद्य,

आपली दृष्टी सुखावते पाहून सगळ्यांचा आनंद

II दिवाळी म्हटली की संचारतो उत्साह

देवी कृपेने प्रत्येक घरातील सदस्यांना लाभो सौख्य....

Iiथोरामोठ्यांना करून वंदन,

सांभाळून एकमेकांचे मन ,

प्रेम , स्नेहा , माया हे सांभाळतात नात्यांना ,

माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना!

नाव: सौ. स्वाती प्रशांत शिंपी.

मोबाईल क्र. +971 565634865

पत्ता:, AL NAHDA , SHARJAH, UAE

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com