जावाई

जावाई

सीमा म्हसे

सिध्दु ऑफीसला जाण्याची तयारी करत करत-करत नाश्ता तयार करत असतो..( तिकडून ओरडतच)..बाबा नाश्ता रेडी आहे या लवकर बाहेर..

बाबा: अरे हो हो आलो रे थांब..

सिध्दु: काय बाबा किती वेळ.. नाश्ता थंड होऊन जाईल नाहीतर..( तेवढयात बेल वाजते).. मी बघतो कोण आहे ते... दरवाजा उघडून.. कोण पाहिजे आपल्याला?

मी देशपांडे.. तुमचा नवीन शेजारी

सिध्दु : ओह अच्छा..मी तुमची काही मदत..वाक्य पुर्ण न होताच तिकडुन मधेच बाबांचा आवाज..

कोण आहे रे सिध्दु..बाबा बाहेर येतच असतात.. त्याच्या जवळ येऊन.. अरे देशपांडे तुम्ही.. या ना या आत या..बसा.. सिध्दु पाणी आण.. आणि हो काकांनाही नाश्ता दे..

देशपांडे:अरे नाही-नाही मी नाश्ता करुन आलोय.. दोन दिवसापासुन तुम्ही दिसला नाही फिरायला म्हणून विचारपूस करायला आलो..

बाबा: अरे बरं झाल की मग.. जरा तब्बेत खराब होती म्हणून आराम करत होतो..

देशपांडे:काय झालं.. जास्त गंभीर नाही ना? आता ठीक आहे ना तब्बेत..

बाबा: नाही नाही काही गंभीर नाही.. आता ठीक आहे तब्बेत ..उद्यापासून येईल फिरायला

सिध्दु चहा नाश्ता घेऊन येतो..

सिध्दु: उद्यापासुन नाही अजुन आराम करा एक दोन दिवस मग जा..

बाबा: आता ठीक आहे रे मी.. बरं का सिध्दु हे आपले नवीन शेजारी देशपांडे.. आणि हो देशपांडे हा माझा मुलगा सिद्धार्थ..सिध्दु नमस्कार करतो..

सिध्दु :बाबा नाश्ता झाल्यावर हया गोळया घ्या आठवणीने.. दुपारचे जेवण तयार करुन ठेवले आहे.. गरम करुन मगच जेवा.. आणि हो दुपारच्या गोळया पण घ्यायच्या आहेत बरं का?

बाबा: अरे हो रे बाबा.. सासुसारख टोमणे नको लावू.. जा तू

सिध्दु: अन् हो चोरुन गोड खाऊ नका..

बाबा: (थोड़े खजील होत) मी कुठे गोड खातो ..अजिबात नाही.. त्या शांताकाकुनं खाल्लं असेल..

सिध्दु :बाबा शांता काकुनेच सांगितलं मला त्यांनी तुम्हाला चोरुन खातांना पाहिलं

बाबा: थांब येऊ दे तिला कामावरुनच काढुन टाकतो आता..

(देशपांडे आणि सिध्दु त्यांना हसतात)

देशपांडे: चल निघतो मी आता..

बाबा: अहो बसा हो देशपांडे.. मस्त गप्पा मारुयात मी एकटाच असणार आहे आता

देशपांडे: नाश्ता छान झाला होता हं सिध्दु..

सिध्दु : Thank you kaka

बाबा: आमच्या सिध्दुच्या हाताला चव आहे बरं का.. छानच करतो तो सर्व.. देशपांडे आमच्या सिध्दुसाठी तुमच्या नजरेत एखादी मुलगी असेल तर सांगा.. चांगल्या पगाराची नोकरी आहे.. निर्व्यसनी आहे..दिसयालाही छान आहे.. अगदी मुलींना हवा तसा...

देशपांडे :हो हो नक्की

(त्यांना सिध्दु मधेच तोडत)

सिध्दु: बाबा मला लग्न नाही करायच.. माहितीये ना तुम्हाला ..मग कशाला तोच तो विषय

बाबा:हो पण मला करायचय नं...

सिध्दु :हसतच..मग करा की तुम्ही.. मला नवीन आई मिळेल

बाबा: नालायका मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय.. सुन हवीय मला.. तुझ्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय मला..

सिध्दु : अरे! आता तर माझ्या स्वयंपाकाच कौतुक करत होतात आणि आता लगेच

बाबा :हो ते जरा तुझ मन राखण्यासाठी खोट बोललो..

सिध्दु: अच्छा.. असुदया मग..बरं बाबा मी निघतो आता ऑफिसला उशीर होईल.. आणि हो आठवणीने गोळया घ्या.. आणि हो आज मला घरी यायला जरा उशीर होईल.

बाबा : का रे?..जास्त काम आहे का आज ?

सिध्दु : नाही बाबा.. ते आज बाबांच श्राध्द आहे.. नेहमीप्रमाणे अनाथआश्रमात जाणार आहे

बाबा: अरे हो..विसरलोच मी ..ठीक आहे..सिध्दु निघुन जातो.

देशपांडे :(आश्चर्याने बाबांकडे बघत).. बाबांच श्राध्द?

बाबा:हमम.. सिध्दु माझा मुलगा नाहीये..

देशपांडे: काय?

बाबा :होय..खरंतर सिध्दु माझा जावई... माझ्या मुलीशी त्याचे 3 वर्षापुर्वी लग्न झाले...सिध्दु माझ्या मित्राचा मुलगा...माझा मित्र सतत आजारी असायचा बायको गेल्यापासुन.. लग्नानंतर चार दिवसाच तोही गेला जग सोडुन.. माझी मुलगी आणि सिध्दु दोघेही लहानपणीचे मित्र मैत्रीण..

देशपांडे: आणि तुमची मुलगी..

बाबा: नाव नका घेऊ तिच.. कपाळकरंटी आहे.. माझ्यावर विश्वास ठेवत मित्राने सिध्दुसाठी माझ्या मुलीची विचारणा केली.. परंतु ती लग्नानंतर दोन दिवसातच ती तिच्या प्रियकरासोबत निघुन गेली..कदाचित मित्राने त्याचाच जास्त धसका घेतला असावा..मला खुप अपराध्यासारखं झालयं..बिचाऱ्या सिध्दुच आयुष्य बरबाद केल कार्टीनं.. लग्नाआधी पळून गेली असती तर बरं झालं असतं.. आणि अस कळालं आहे की त्यानेही तिला धोका दिला..

देशपांडे: तरी सिध्दु तुमच्यात का राहतो?

बाबा: खरंच माझी मुलगी कपाळकरंटी आहे.. सिध्दु सारखा मुलगा गमावला.. आणि बापही..मेली आहे ती माझ्यासाठी आता.. सिध्दु म्हणतो जस लग्नानंतर मुलीची जबाबदारी असते की सासरच्या माणसांची सांभाळ करायची..मग मुलाने पण का नाही उचलायची ती.. आणि तसंही आता आपलं दोघांच कोणी नाही पण आपण आहोत ना एकमेंकासाठी..माझ्या मुलीची सर्व कर्तव्य तोच पार पाडतोय

देशपांडे: मग सिध्दुने तेव्हाच का नाही केलं दुसरं लग्न ?

बाबा: कारण त्याच प्रेम होतं माझ्या मुलीवर पण तिला ते समजलच नाही.. किमान आता जरी सिध्दुने लग्न केलं तर माझी अपराधेपणाची भावना जाईल.. (थोड़े हळवे होत) खुप गोड मुलगा आहे हो माझा सिध्दु.. नक्कीच काही तरी पुण्य केलेलं असेल मी म्हणून ऐसा मुलगा मिळाला.. कस ऋण फेडु या पोराचे..

देशपांडे:काही काळजी करु नका.. शोधु आपण चांगली मुलगी..

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते..

बाबा: आता कोण आलं अस म्हणत दार उघडतात..अरे सिध्दु..काय रे गेला नाहीस का अजुन?..

सिध्दु : अहो मोबाईल घरी राहीला होता.. तोच घ्यायला आलोय

बाबा: थांब देतो ..म्हणुन म्हणतो लग्न कर.. म्हणजे बायको सर्व ठेवेल लक्षात..सर्व तुला हातात देईल..

सिध्दु: बाबा तुम्ही परत सुरु झालात आणि सर्व हातात देण्यासाठी बायको कशाला हवी....(त्यांच्या हातातून मोबाइल घेत मिश्किलपणे म्हणत) निघतो मी लवकर..

बाबा: नालायका.. किती पळणार आहेस पळ..तुझ लग्न लावल्याशिवाय राहणार नाही मी.. समजल का लेका..

सिध्दु :बाबा bye.. lv u

बाबा:Lv u 2 नालायका.. 😊

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com