बंड्याची चाळ

बंड्याची चाळ

संजय धनगव्हाळ

बंड्या म्हणजे चाळीतला विनोदी पुरुष तो रोजं काहीना काही कारणाने चाळीत हाश्यकल्लोळ करायचा बंड्याचा विनोदी स्वभाव असल्यामुळे चाळीकरी सतत हसतचं रहायचे बंड्याचा सर्वांना एकच सल्ला होता. माणसाने कसं नेहमीच हसतं रहायचे.कितीही चिंता दुःख ताणतणाव असला तरी हसल्यामुळे माणूस नौराशात रहात नाही. चेहरा नेहमीच हसरा राहतो आणि आनंदाने फुलतो म्हणून रोज रात्री सर्व चाळकरी जेवण आटोपल्यावर चाळीतल्या ओट्यावर एकत्र जमून विनदांचा हाश्यगजर करतं असे.तसे चाळीत नमुनेही भरपूर होते.त्यापैकी एक म्हणजे दामू मास्तर,एक नंबरचा बावळट तिरसट माणूस. त्याच्यासारखा तामसी माणूस साऱ्या पंचक्रोशीत नव्हताचं. त्यांची एकुलती एक कन्या चिंगी,तिच बंड्याशी सुत जुळलं होतं पण दोघांच लग्न काही होईना,मग काय बंड्या काही केल्या शांत बसणारा नव्हता.

एकदा तो ज्योतिष्याचा वेश धारण करून दामू मास्तरच्या घरी धडकला.मास्तरलाही भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता म्हणून मास्तरने बंड्याच्या हातात हात दिला आणि काय...

येत्या काही दिवसात तुमच मरण अटळ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीचं 'ब' नावाच्या मुलाशी लग्न केले तर तुमचं भयंकर मरण टळेल नाहीतर महाभयंकर मरण निश्चित समजा.मास्तर घाबरला कितीही केले तरी दामू मास्तर बावळटचं ना 'ब' म्हणजे बंड्या हे मास्तरच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.तेव्हा वेळ न घालवता बंड्या चिंगीच लग्न धुमधडाक्यात झालं आणि बंड्या चिंगी सोबत सुखात संसारात रमला.

गणपती उत्सवानिमित्त चाळीत कीर्तनाचा कार्यक्रम असायचा पण या वेळी कीर्तनकार बुवांनी चाळीत यायला असमर्थता दाखवली. रात्री ओट्यावर सर्व चाळकरी जमले असता स्वभावानुसार बंड्याने गंभीर चेहरा करून जाहीर केले की.'मायबाप चाळकरी हो' बंड्याचा गंभीर चेहरा एकटक पाहून चाळकऱ्यांनी तोंडाचा नगारा उघडाच ठेवला.'आज कीर्तनकार बुवा येणार होते पण...वाटेतचं'....

'आ'....

'त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि....ते गेले'

'काय'!

'घरी परत गेले,घरी गेल्यावर त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेताना वाटेतच'

'आई गं'

'जुलाबाचा त्रास वाढला'

'छि'.....

'म्हणजे' बुवांना जुलाब होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला म्हणून ते यंदा किर्तनाला येणार नाहीत आणि नाही आले ते फारच बरं झालं उगाचं चाळीत सुगंधित प्रदूषण झालं असतं.

चाळीतला आणखी एक विद्वान नमुना म्हणजे नाना. नाना झेड.पी.त साधा कारकून पण रूबाब मात्र एखाद्या साहेबा सारखा,नाना तसे विद्वान गायणातले गाढे आभ्यासक,रोज सकाळी बाथरूममध्ये त्यांचा रियाज सुरू व्हायचा रियाज सुरू झाला म्हणजे सकाळचे सात वाजल्याचं चाळकऱ्यांना बरोबर कळायचं.चाळीत होणाऱ्या कार्यक्रमाची सुरूवात गाण्याने झाली पाहीजे असा नानांचा नेहमीचा आग्रह डावलून त्यांच्या गायकीनेच कार्यक्रमाचा शेवटच असायचा.'नाना तुम्ही डोळे बंद करून गाण्याला का सुरवात करतात'असा बंड्याने विचारलेल्या खोचट प्रश्नाला उत्तर देताना नाना म्हणतात.

'अरे बाळा गाण सुरु करण्याधी गाण्याला ताण द्यायचा असतो आणि ताण हा डोळे बंद करून दिला जातो' मग काय नानाने डोळे बंद करून गाण्याला ताण मारला की

गाण संपल्यावरच ते डोळे उघडायचे आणि त्यांच्या समोर कोणीच नसायचं.तेव्हा नानांची गायकी किती चांगली याचा अंदाज येतो.

कधीतरी सदानंदने बंड्याला एप्रिल फुलं केले होते.याचा वचपा नाही काढला तो बंड्या कसला,लावला दुसऱ्याच मोबाईलवरुन सदाला फोन 'आपण सदानंद बोलता आहात का'

'हो मी सदानंदच बोलतोय'

आपण सर्वात जास्त नेटचा वापर करता म्हणून कंपनी आपल्याला एक गिफ्ट देत आहे.तेव्हा आपण ते गिफ्ट स्विकारून कंपनीचा आदर राखावा'.

हे ऐकून सदानंदाला तर दिवसा चांदण्या दिसायला लागल्यात.

झालं ठरल्यावेळी एक भला मोठा खोका घेवून आलेली गाडी चाळीत दाखलं झाली आणि गिफ्ट पाहून सदाच्या आनंदाला उधाण आले.चार माणसांकडूनही न उचलला जाणारा खोका झेड आकाराच्या जिण्यातून कसाबसा सदाच्या घरात आदळला आणि आधी पार्टी झाली पाहीजे या बंड्याच्या विनंतीचा मान राखून सदानंदने सर्व चाळकऱ्यांना मनसोक्त खाऊ घालून खोका उघडण्याचा श्रीगणेश केला आणि सर्व चाळकऱ्याचं तोंडाचं पाणीच सुकलं,सदाला तर भोवळच आणि आपण काय पाहतोय यावर सदाचा विश्वासच बसत नव्हता.त्या खोक्यातून पाच किलो वजनाचे तिन दगडं पाहून सदा तरजोरजोरात पाय आदळायला लागला, खोक्यातून एप्रिलफूलची चिठ्ठी वाचून खाऊन तृप्त झालेल्या साऱ्या चाळकऱ्यांमधे हाश्या पिकला आणि सदा त्याच दगडांवर डोकं आदळायला लागला.जेव्हढा त्रास खोका आणायला झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास सदाला पाच किलोचे तिन दगड खाली न्यायला झाला.

सालाबादप्रमाणे चाळीच्या वार्षिक मिटींगमध्ये विविध विषयांच्या समस्यांवर सल्ला मसलत सुरू असताना चकणे काकांनी आपला नेहमीचा विषय पुढे करून मनातल दुःख चाळकऱ्यांच्या समोर मांडल.

'हे बघा आपण सारे सज्जन,समजदार, सुशिक्षित,शिक्षीत आहोत माझ्या विषयाला आपण सर्वांचा होकार गृहीत धरून मी माझा विषय आपना समोर मांडतो,

आपण दरवर्षी चाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करतो त्याच प्रमाणे भारतातील विविध राष्ट्रीय पुरुषांची जयंती पुण्यतिथीही साजरी करावी असे माझे मतं आहे आणि आपण सर्व सहमत आहातं असं मी समजतो'.

'हे बघा चकणे काका अख्ख्या भारतातच नाही तर या चाळीत सुध्दा तुमच्या ईतका महान पुरुष कोणीही नाही.आपल्या ईतका महान पुरूष दुसरा कोणी असुच शकत नाही, आपणच राष्ट्रीय पुरुष आहात तेव्हा यावर्षीपासून तुमचीच पुण्यतिथी व जयंती साजरा करू काय'

बंड्याच्या अशा बोलण्याने चकणे काकांचा राग डोक्याच्या पार गेला आणि दोन दिवस चकणे काकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले.

चाळीतले जेष्ठ पुरूष वामनराव यांचा साठाव्वा वाढदिवस साजरा करायच ठरवल्यावर बंड्या बुके ऐवजी चक्क पुष्पच्रकच घेवुन आला आणि वामनरावांच डोकचं फिरले 'अरे गाढवा तू हे काय घेवू आला मी काय मेलो का?'

'आहो काका फुलवाल्याकडे बुके शिल्लक नव्हता म्हणून मी हे विरचक्र घेवू आलोय आणि तरी काकूंच्या शाब्दीक चकमकीत आपण रोज शहीद होता तेव्हा हे घ्या विरचक्र'

'ठेव माझ्या छातड्यावर'

दिग्याचा पोरगा मन्या आठवीत तिनवेळा सर्व विषय नापास झाला म्हणून वर्गशिक्षकांनी वडिलांना घेवून येण्यास सांगितल्यावर भितीपोटी

मन्याने बंड्याला वडिल म्हणून वर्गशिक्षकांसमोर ऊभा केला.

'आपण वडिल का'?

'काही शंका'?

'नाही मी आपल सहजं विचारल'

'तो माझाच आहे मीच त्याला पै...'

'पुरे आता तुमचे उपद्व्याप सांगू नका,फार पराक्रमी आहे हो तुमचा मुलगा!'

'मगं तो माझा मुलगा आहे पराक्रम करणारचं कारण मीचं त्याला पै....'

'बसं झालं उगाच कशाला तुम्ही तूमचे दुःख उगाळताय'

'सांगा काय पराक्रम केले माझ्या लाल ने'

'तुम्ही त्याचे प्रगती पुस्तकं पाहिल का?

'पाहिले असते तर आलो असतो का?'

'आठवीत तिनदा सर्व विषय नापास झालाय तुमचा विरपराक्रमी मुलगा'

'काय सांगता!'

'विचारा त्याला'

'काय...रे गुरूजी खर बोलताय का' मग बंड्यानेही वडील या नात्याने वर्गशिक्षकांसमोर मन्याला बदड बदड बदडला,'काय करणार गुरूजी तो जरा मंद आहे तुम्ही शिकवलेलं त्याला समजत नाही अस तो म्हणतो'

'मग बाकीच्या मुलांना कस समजतं'

'ते जास्त हुशार आहेत ना'

'वा छान धन्य तो बाप आणि धन्य तुमचा पराक्रमी मुलगा फाडा फाडा ती नापासची प्रगती आणि ही घ्या पास झाल्याची प्रगती आणि हा घ्या शाळा सोडल्याचा दाखला'

'बापरे बंड्यादादा आता कसं होणार'

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.'

वड सावित्री पौर्णिमेला चिंगीला वडाच्या झाडाला दोरा बांधता आला नाही म्हणून तिने पुढल्या जन्मातही बंड्याच मिळावा यासाठी पोळ्याच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरा बांधुन वडसावित्री पौर्णिमा साजरी केली.

तर अशी ही बंड्याची चाळ आणि चाळीतले नमुने अशा रोज घडणाऱ्या गंमती जमंती मुळे चाळकरी हासत खेळत आनंदात रहायचे तेव्हा सारं गावं झोपून जायचं तरी चाळीत हाश्या कल्लोळ सुरूच रहायचां.

धुळे

९४२२८९२६१८

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com