सेवेतून स्वविकास

सेवेतून स्वविकास

डॉ. संदीप भानोसे

रामकृष्ण परमहंस ह्यांनी आपल्या शिष्यांना ,”शिव भावे जीव सेवा “ करावी हा बोध दिला होता . स्वामी विवेकानंद आयुष्य भर ह्याच मार्गाने कर्मसेवा करत जगाचे प्रेरणास्थान बनले. सेवा ही दीनदुबळ्यांची, गरजूंची, गरिबांची , दिव्यांगाची तसेच पशु,पक्षी व प्राण्यांची करता येते. सेवा ही निस्वार्थपणे केली जाते .स्वामी विवेकानंद ह्यांनी सेवेचे महत्व सदर प्रसंगात खूप छान समजावून सांगितले आहे . याबाबत स्वामीजींच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला जातो.

एका पत्रकाराने स्वामी विवेकानंदांची किर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्यांकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्या‍त, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यावेळीच पत्रकारांचे दोन मित्र त्यास भेटावयास आले आणि बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्ले्ख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्यांचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांची ही आस्थेने विचारपूस केली. या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की, तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या‍ काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले.

निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आलो होतो. पण तुम्हीे मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही. यावर स्वाामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्तच महत्त्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्या‍पेक्षा भाकरी देणे हे महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

सेवेतून स्वविकास साधला जातो. मानसशास्त्रात स्व विकासाचे विविध घटक सांगितले आहे. जसे संवाद कौशल्य, नियोजन क्षमता ,दूरदृष्टी , व्यवस्थापन कौशल्य ,देह बोली , सृजनशीलता ,निर्णय क्षमता ,सचोटी ,कष्ट करणे ,प्रेरणा , संघटन बांधणी ,नेतृत्व , सकारात्मकता ,ध्येय निश्चिती इत्यादी, हे गुण सेवेतून विकसित होतात .सेवेतून स्वविकास कसा साधला जातो व सेवा करणे हाच सर्वात मोठा धर्म अर्थात कर्तव्य कसे ते पुढील कथेत स्वामीजींनी मांडले आहे .

प्राचीन काळची गोष्ट आहे. एक राजा होता. राजाला चार पुत्र होते . राजा सद्विचारी, सद्‌धर्माचं पालन करणारा होता. आपल्या मागं आपल्या पुत्रांनी ही तसंच वागावं, आणि राज्यकारभार करावा, असं त्याला वाटत होतं. गादीवर चौघांपैकी कोण बसणार? त्यासाठी राजानं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. राजानं चारही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, "मुलांनो, आपल्या राज्यात जा, आणि खरा धर्मात्मा कोण असेल? त्याला घेऊन या. त्याचा मी सत्कार करणार आहे.'

चार ही पुत्र धर्मात्म्या च्या शोधात निघाले.

पहिला मुलगा एका व्यक्तीला घेऊन आला. ते गृहस्थ मालदार होते. पण खूप उदार होते. त्यांनी खूप संपत्ती दानधर्मात वाटून टाकली होती. राजानं या दानशूर व्यक्तीचा यथोचित सत्कार करून त्याची पाठवणी केली.

दुसरा मुलगा एका धर्मात्म्याला घेऊन आला. तो एक व्रतस्थ यात्रेकरू होता. त्यानं चारधाम यात्रा केल्या होत्या. पायी फिरला होता. अवघं जीवन त्यानं देवदर्शना साठी वाहिलं होतं. ते गृहस्थ तेजस्वी होते. राजानं त्यांचाही सुयोग्य असा आदर सत्कार केला आणि त्यांची पाठवणी केली.

तिसरा मुलगा त्याच्या दृष्टीने एका धर्मात्म्याला घेऊन आला. कोण होते हे धर्मात्मा? ते होते एक व्रतस्थ साधु. संन्यास स्वीकारून ते ध्यान धारणा करीत होते. राजवाड्यात आल्यावरही त्यांनी त्यांची वेळ होताच ध्यान धारणेला सुरुवात केली. राजानं या संन्याशाचं ही आगत-स्वागत केलं आणि आदरपूर्वक त्यांची पाठवणी केली.

चौथा मुलगा धर्मात्म्याच्या शोधात होता. त्याला आधीच्या तिघां प्रमाणे असा कुणी धर्मात्मा आढळला नाही. पण एका माणसाकडं त्याचं लक्ष गेलं तो साधा कष्टकरी शेतकरी होता. त्याच्या शेतावरील कुत्र्याचा पाय दुखावला होता. त्याची तो सेवा करीत होता. मुलगा यालाच धर्मात्मा म्हणून घेऊन आला. राजानं विचारलं,

"आपण काय करता?'

"मी काळ्या आईची सेवा करतो. पिकेल त्या धान्यातून स्वतःला पुरेल एवढंच धान्य ठेवून बाकीचं गरीबांना वाटतो. माझ्या आईनं मला शिकवलंय. भुकेल्याला अन्न द्यावं. आजाऱ्याची सेवा करावी. आंधळ्याला हात द्यावा, लंगड्याला आधार द्यावा आणि मुक्या प्राण्यांना सांभाळावं. मी तसं करतो.'

राजानं याचा ही सत्कार केला. पाठवणी केली. त्यानंतर चौथ्या मुलाला राजानं गादीवर बसवलं. कारण त्याने खरा धर्मात्मा ओळखला होता.

कथाबोध

धर्म म्हणजे कोणतंही कर्मकांड नाही, देवपूजा नाही. "सेवा परमौ धर्मः" असं आचार्य विनोबांनी म्हटलंय. दुःखीतांची सेवा हीच ईश्वरपूजा होय. पिडितांचे अश्रू पुसणं, दुबळ्याला आधार देणे, थंडीत कुडकुडणाऱ्याला ऊबदार वस्त्र देणं, भुकेलेल्याला अन्न देणं आणि निष्पाप मुलांना प्रेम देणं हाच खरा धर्म आहे. शाहीर राम जोशी यांनी एका कवनात धर्माच्या नावानं अधर्म करणाऱ्यांचा दंभस्फोट केला आहे. शिवाय धर्म म्हणजे नुसते वैयक्तिक सद्‌वर्तन नव्हे. स्वतःला विसरून इतरांसाठी काही करणं म्हणजे खरा धर्म होय!

गरुडझेप प्रतिष्ठान ह्या आमच्या सामाजिक संस्थेचा उद्देश सामाजिक सबलीकरण आणि परिवर्तन आहे .ह्या भूमिकेतून गेली २५ वर्षे विविद सामाजिक कार्य करत आहे .

1. corporate training – उद्योगात प्रशिक्षण आणि सल्ला

८५० उद्योगात विविद व्यवस्थापन विषयांवर कीर्तने

( टाटा ग्रुप ( स्टील , मोटर्स , पावर .) , बजाज , crompton, L& T ,

कोकोकोला ,गोदरेज , महेंद्र , GSK इत्यादी )

2. आधुनिक शेती- ....शेवंती , जरबेरा ,कार्नेशन ह्या विदेशी फुलांची निर्मिती ...अनेकांना मार्गदर्शन केले ...

3 क्रीडा मानस शास्त्राचा गिम्यास्तीक्समध्ये प्रयोग करून अनेक खेळाडू घडवलीत ..

( आजपर्यंत ५ शिव छत्रपती पुरस्कार विजेते तयार केले )

4. १५०० महाविद्यालयात व ५०० + शाळेत मुलांना व्यक्तिमत्व विकासावर , नेतृत्र्त्व विकासावर

१२ लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे

5. मानस शास्त्रीय व्यक्तिमत्वाचे परीक्षण आणि विश्लेषण ...

( ३८ उद्योजकीय गुण – दूरदृष्टी , नियोजन , निर्णय , अहंकार ,प्रेरणा ,सृजनशीलता , वेळेचे भान , प्रामाणिकपणा इत्यादी

गुणांचे परीक्षण आणि विश्लेषण )

मंत्रालयात IAS अधिकारी वर्गासाठी गरुडझेप –नेतृत्व विकास कार्यशाळा

गेली अनेक वर्षे पोलीस विभागासाठी ,” ताण तणाव व्यवस्थापन “ कार्यशाळा

सुजन पालकत्व कार्यशाळा

राजकीय पक्षांना मार्गदर्शन व नेत्यांचे मानस शास्त्रीय विश्लेषण

सामाजिक जबाबदारी आणि कार्य

१) वाहतूक सुरक्षा अभियान

७ जागतिक विक्रम केले आहेत .

( सातत्यपूर्ण २५१ , ३६५ , ५५० , ७०० , ९०० , १००० , १३०० दिवस वाहतूक सुरक्षा प्रबोधन )

२) गोदा स्वच्छता मोहीम - २० वर्षांपासून निर्माल्य आणि गणेश मूर्ती

संकलन , गोदा – नंदिनी घाट स्वच्छता मोहिमा

३) बेटी बचाव - बेटी पढाव अभियान

४ ) नंदिनी – गोदा संगम स्वच्छता मोहीम - २५ कार्यकर्ते संगमावर रोज

पहाटे ६ ते ८ स्वच्छता ( प्लास्टिक , कपडे , बारदान , बाटल्या ) सुरु आहे

५ ) गडकोट संवर्धन आणि स्वच्छता - ७५ + दुर्गांवर स्वच्छता मोहिमा यशस्वी केल्या आहेत

६) विविद शाळेत पर्यावरण सुरक्षेवर प्रबोधन आणि कार्यशाळा

७) स्वतः गेली २० वर्षे सायकल चालवत - प्रदूषण टाळा ...आरोग्य संपन्न

व्हा ! हा संदेश देत आहे

८) स्त्रीभ्रुण हत्यावर जनजागर सुरु आहे

९ ) महिला सबलीकरणावर ५०० + बचत गटांसाठी कार्यशाळा

१०) युवा पिढी साठी – नेतृत्वगुण कार्यशाळा , उद्योजकता विकास कार्यशाळा

f) १०० + राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

१९९८ मध्ये राष्ट्रपतींकडून सन्मानित

१९९८ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून ,” औद्योगिक कीर्तनकार “ उपाधी प्राप्त

g) देश – विदेशात प्रबोध , व्याखान , कार्यशाळा संपन्न

h) विविद व्यवस्थापन विषयांवर DVD आहेत ( स्व – व्यस्थापन , जपानी

व्यवस्थापन , गरुडझेप – नेतृत्वगुण विकास .....)

ह्या समाज सेवेतून आमचे स्वतःचे व्यक्तिमत्व निश्चित रित्या विकसित झाले आहे .

औद्योगिक कीर्तनकार व व्यवस्थापन तज्ञ

ई-मेल sandipbhanose@gmail.com

मोबाईल- 7588109179

नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com