दिवाळीत डबल गीफ्टस्

दिवाळीत डबल गीफ्टस्

स्वराली हरदास

दिवाळी म्हटली की मला माझी मुंबई मधली दिवाळी आठवते. घरची दिवाळी मीस करत होते. कामानिमित्त मुंबईमध्येच होते. घरी जाता आले नाही. मग तेव्हा मुंबईमधील माझ्या रुममेट्स आणि मी आम्ही मुंबई मधल्या घरी दिवाळी केली.

दाराबाहेर रांगोळी, दाराला छोटे छोटे कंदील लावून. पणत्या लाऊन दिवाळी साजरी केली. आणि २ दिवसांनी घरी गेले. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजसाठी. घरी सुद्धा दिवाळीत खूप मजा येते. लक्ष्मी पूजनाला आमच्या दुकानात पूजा असते. सगळे एकत्र येतात. पूजा करतात आणि भाऊबीजेच्या दिवशी मामाकडे एकत्र येऊन खूप धम्माल करतो. दिवाळी म्हटली की आम्ही सगळे खूप उत्साही असतो. एकत्र येऊन पहाटे एकमेकांना तेल लाऊन आंघोळ घालतो. भाऊ, मामा, पप्पा, काका सगळे फटाके उडवतो. ‘दिवाळी’ हा सण असला की लगेच आमची तयारी सुरू असते. काय काय करायचं, काय घालायच आम्ही भावंड सगळे ठरवून एक थीम करून त्याप्रमाणे नवीन कपडे घालतो. दिवाळीत माझा वाढदिवस पण येतो. त्यामुळे डबल मजा. सेलिब्रेशन आणि डबल गीफ्टस् मिळतात.’ त्यामुळे मला दिवाळी जास्त आवडते.

नाशिक

(लेखिका नाट्यकलाकार आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com