प्रियंका सरवार

माणसाच्या धावत्या प्रवासाला

याकाळी लगाम लागला

जगण्याची नवी ओळख दाखवायला

दूरदेशातून एक पाहुणा आला

सुरू झाले युद्ध निशस्त्राचे

तुमचे आमचे त्याच्याशी

एका एका श्वासाची ...मग

जाणीव होऊ लागली स्वतःशी

मुखवट्यांची माणसे आधी

परकी वाटायची

आता त्यातच शोधावी लागताय

माणसे आपली नात्याची

कधी वाटले नव्हते की

चार भिंतीशी नातं जुळेल

रात्रीची निरव शांतता

दिवसालाही जवळचे करेल

चुकल्या साऱ्यांच्या दिशा

मार्ग सारे सुने झाले

नवं काही शोधता शोधता

दिवस मात्र जुने झाले

चांगले झाले तेवढे

अंधश्रद्धेचा घात झाला

बुरसटलेल्या विचारांचा

आज कुठेतरी मात झाला

मृत्यूचा असा तांडव पाहून

आज तोही दार लावून बसला

कोण्या काळच्या त्याच्या विश्वासावर

कदाचित...आज तोच मात्र हसला

घंटेचा निनादही परका झाला

अजनाचा आवाजही नाहीसा झाला

मनात फक्त एक आणि एकच विचार आला

'आज हा देवच quarantine झाला

आज हा देवच quarantine झाला '

नाशिक