रवींद्र मुकुंदराव मालुंजकर

मानसन्मानाची कधी इच्छा धरू नका मनी

व्हावे कार्यकर्तृत्वाने जगी गौरवाचे धनी...

याचकाला देता काही गाणे समृद्धीचे गावे

देता आधार दुसऱ्या मन आनंदून जावे...

हात बुडत्याला द्यावा जपा मानवाचा धर्म

जगताना प्रामाणिक ध्यानी ठेवा हेच वर्म...

घेता आदर्शाचा वसा कुणा दोष देऊ नका

वाटा इतरांना प्रेम व्यर्थ करू नका टिका...

असत्याचा व्हावा नाश सत्य सर्वदा जिंकावे

ओलाव्याने मानव्याच्या जग ओलेचिंब व्हावे...

नाशिकरोड

मोबाईल : ९४२३०९०५२६