Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकालसुसंगत शिक्षणपद्धतीची गरज

कालसुसंगत शिक्षणपद्धतीची गरज

– डॉ. राम ताकवले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू

स्पर्धेच्या युगात नवीन माध्यमे, दळणवळणाची साधने आणि संप्रेषणाच्या कक्षा आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. बदलत्या जगाबरोबर शिक्षण पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलाने अपरिहार्य आहे. आताचे युग डिजिटल युग आहे. त्याच्याशी समन्वय साधणे काळाची गरज आहे.

- Advertisement -

यासाठी कालसुसंगत शिक्षण पद्धती विकसित करण्याची गरज आहे. प्राचीन काळात जशी माध्यमे उपलब्ध होती तसे शिक्षण होते. मध्ययुगीन काळात सरंजामशाहीत त्या सामाजिक आणि भौगोलिक रचनेवर आधारित शिक्षणपद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे डिजिटल युगाशी समन्वय साधून तशा प्रकारची शिक्षण पद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे.

स्पर्धेच्या युगात नवीन माध्यमे, दळणवळणाची साधने आणि संप्रेषणाच्या कक्षा आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. बदलत्या जगाबरोबर शिक्षण पद्धती व मूल्यमापन पद्धती बदलाने अपरिहार्य आहे. आता पुढील युग डिजिटल युग आहे. त्याच्याशी समन्वय साधणे काळाची गरज आहे. तेव्हा काळाशी सुसंगत शिक्षण पद्धती विकसित करण्याची गरज आहे. प्राचीन काळात जशी माध्यमे उपलब्ध होती तसे शिक्षण होते. मध्ययुगीन काळात सरंजामशाहीत त्या सामाजिक आणि भौगोलिक रचनेवर आधारित शिक्षणपद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे डिजिटल युगाशी समन्वय साधून तशा प्रकारची शिक्षण पद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे. मागणीनुसार परीक्षा ही संकल्पना 15-20 वर्षार्ंपूर्वी. नवीन होती. मात्र सद्यस्थितीतीलतंत्रज्ञान विकसनाची गती लक्षात घेता मागणीनुसार परीक्षा ही काळाची गरज आहे. तिचा अवलंब करणे समाजासाठी महत्वाचे आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर शैक्षणिक विकासासाठी करायला हवा ही या दशकाची गरज आहे. शिक्षण आणि सामाजिक विकास, शिक्षण आणि औद्योगिक विकास, शिक्षण आणि सांस्कृतिक विकास या एकमेकांशी संबंधित बाबी आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची गरज आहे

आजची शिक्षणपद्धती आशयावर आधारित आहे. आशय समजावून शिकवला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. एकविसावे शतक तंत्रज्ञान क्रांतीचे शतक आहे. हे शतक डोळ्यासमोर ठेवून मूल्यांवर आधारित नवीन शिक्षणपद्धतीचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाची सांगड आणि मूल्यांची जपवणूक हे आव्हान नवीन शिक्षणपद्धती अमलात आणण्याची गरज आहे. औद्योगिक विकास साधण्यासाठी स्वयोग, सहयोग आणि उद्योग या त्रिसूत्रीचा वापर झाल्यास विकासाला गती मिळेल यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकत राहायला हवे. आधुनिक युगात तंत्रज्ञानातून सर्व समाजाला शिक्षित करता येईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यातून समाज परिवर्तन घडून येईल हे या पद्धतीचे मोठे यश असेल. ज्ञान आणि विकास एकमेकांना पूरक असल्याने शैक्षणिक विकासाला गती मिळेल.

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. आज या प्रक्रियेमध्ये सध्या बदल घडत आहेत. 2005 पासून शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या आशयावर कमी भर द्यावा मात्र या आशयातून निर्माण होणार्‍या प्रक्रियेवर अधिक भर देऊन ती प्रक्रिया व्यवस्थितपणे समजून घेण्याच्या मुद्याला महत्त्व देण्याचा विचार प्रामुख्याने पुढे आला. कारण आशयाची संपूर्ण माहिती घेऊन ती कशा पद्धतीने वापरायची ही प्रक्रिया म्हणजे ज्ञान होय. शिक्षण म्हणजे भरपूर माहिती मिळविणे आणि त्यातून गरज असेल तिथे आवश्यक ती उत्तरे देणे होय. ही एक प्रोसेस ऑफ लर्निंग आहे. जी व्यक्ती ती योग्य प्रकारे करते ती व्यक्ती चांगला विद्यार्थी बनू शकते. अशी व्यक्ती शिक्षणाकडे केवळ माहिती म्हणून बघते. कारण अभ्यास करणे म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया समजावणे होय. ती वाढवणे, तिला सतत वृद्धींगत करणे होय. ज्ञान मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचा वापर, म्हणजेच अ‍ॅप्लिकेशन कसे करावे हे जाणून घेणे म्हणजे खर्‍या अर्थाने शिक्षण होय. परंतु आपल्याकडे जुन्या शिक्षण पद्धतीनुसार केवळ पाठ्यापुस्तकावर आधारित प्रश्नोत्तरे यावरच अधिक भर दिला जात होता. यामुळे मुलांना नेमका आशय समजत नाही. ते केवळ प्रश्नाचे उत्तर पाठ करतात आणि स्मरणशक्तीला ताण देऊन तेवढ्या ओळी आठवून लिहितात. पण ही पद्धत म्हणजे शिक्षण नव्हे.

मुळात एखाद्या विशिष्ट मुद्यातील नेमका आशय कोणता हे समजून हा आशय आपण आणखी कुठे कुठे उपयोगात आणू शकतो याचे ज्ञान मिळवणे हे आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीला अपेक्षित आहे. कारण शिक्षण म्हणजे काय तर शिक्षणातून बौद्धिक, कृतीशील आणि मनाची जडणघडण पूर्ण करणे होय. पण दुर्दैवाने आपल्याकडे लोक या विचाराकडे जातच नाहीत. उपलब्ध माहितीच्या आधारावर असणार्‍या प्रश्नोत्तरावरच अधिक भार दिला जातो. परंतु ही पद्धत आणि दृष्टीकोन चुकीचा आहे. त्यामुळे अजूनही तिच पद्धत धरून ठेवण्याच्या अट्टाहासापायी अनेक पालक, शिक्षक मुलांजवळ साचेबद्ध अभ्यासाचा आग्रह धरताना दिसतात. अशा पालकांना म्हणूनच बदलत्या शिक्षणपद्धतीचे आणि बदलत्या अभ्यासक्रमाचे ओझे वाटते. कारण सध्याच्या अभ्यसक्रमाच्या प्रक्रियेत प्रॉब्लेम सॉल्व्हींग स्वरुपाचे प्रश्न असतात. यामध्ये किती ज्ञान आहे हे महत्त्वाचे नसते तर प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया समजली का हे अधिक महत्त्वाचे असते आणि म्हणूनच यामध्ये साचेबंद उत्तरे नसतात. अमूक प्रश्नाचे हेच उत्तर असे नसते आणि म्हणूनच अभ्यासक्रम खूप बदलला आहे, तो खूप अवघड झालेला आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बर्‍याचशा पालकांकडून आणि शिक्षकांकडून ऐकायला मिळतात.

मुळात आपण पूर्वीचा जो ढाचा आहे त्यातून बाहेर पडायलाच तयार नाही. म्हणून हा बदल म्हणजे अडचणीचा किंवा मोठा वाटतो. आपली मुले म्हणजे कॉम्प्युटर नाही किंवा स्टोअरेजही नाहीत, जिथे माहिती साठवली म्हणजे, ती जशीच्या तशी बाहेर येईल. तर आपली मुले म्हणजे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया करणारा बुद्धिमान मानव आहे हे लक्षात घेतले पाहिजे. असा विचार केला तर आपण या बदलाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे अभ्यासाचे भरपूर मार्ग शोधू शकतो.

मुलांना आशय सांगितला की, विचारलेल्या प्रश्नांची अमूकच उत्तरे आली पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते. साचेबद्ध अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत काय होते की, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मुले आपल्या मेमरीत जातात, तिथून ते पुस्तकात जातात आणि ज्या दोन ओळी आठवतात ते उत्तर लिहितात. पण हे काम कॉम्प्युटरही करू शकतो. मात्र माणूस हा कॉम्प्युटर होऊ शकत नाही. त्याच्याकडे स्वतंत्र विचार करण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच तो कॉम्प्युटरपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे आणि नेमकी हीच गोष्ट शिक्षकांना आणि पालकांना समजत नाही.

शिक्षणाची प्रक्रिया ही योगाची प्रक्रिया आहे. त्यामुळे शिक्षकांनी कितीही सांगितले तरी हा योग होत नाही. कारण योग हा स्वतःचा स्वतःलाच करावा लागतो. हे न समजल्यामुळे अनेकजण अभ्यासक्रम खूप वाढला आहे, अवघड आहे अशी तक्रार करताना दिसतात आणि मुलांना अधिकाधिक पाठ्यपुस्तकांशी जुंपण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते चुकीचे आहे. अलीकडच्या पाठ्यपुस्तकातील आशय खूप मोठा आहे. पण हा बदल होणे गरजेचे आहे आणि तो होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून हा बदल आहे. स्वतःची विचार करण्याची प्रक्रिया निर्माण व्हावी हे त्यातून अपेक्षित आहे. आमचे तर असे म्हणणे आहे की, अभ्यासक्रमातून पुस्तकच काढून टाका. कारण हेच पुस्तक अभ्यासासाठी वापरावे असे काही नसते. कारण पुस्तकातून मुलांना जे काय समजते ते त्यांच्या पूर्वज्ञानातून समजते. एकाच पुस्तकातून प्रत्येक विद्यार्थी एकाच प्रकारची माहिती घेईल असे नसते. ते व्यक्तीसापेक्ष असून त्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रत्यक्ष कृतीतून शिकवणे म्हणजे शिक्षण होय. पाठांतर म्हणजे शिक्षण नव्हे. एखाद्या विषयावरची दहा वेगवेगळी पुस्तके वाचून त्यातून स्वतः आशय काढणे आणि त्यानुसार प्रश्नाचे उत्तर देण्याची प्रक्रिया वापरणे अपेक्षित आहे. थोडक्यात ही प्रोसेस ऑफ सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स आहे.

ज्ञान मिळवल्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधताना स्वतःचा मार्ग काढता आला पाहिजे आणि ते आपल्याला हव्या त्या मार्गाने काढता आले पाहिजे, हीच ज्ञानाची प्रक्रिया आहे. अमुक एक प्रश्न पुस्तकात दिलेलाच नाही तर आता काय करायचे? असे प्रश्न या प्रक्रियेतून निर्माण होणार नाहीत.

19 व्या 20 व्या शतकातील जुन्या अभ्यासाच्या पद्धती साचेबद्ध होत्या. त्या अभ्यासाच्या पद्धती आपण टाकून दिल्या पाहिजेत. त्याच पद्धती धरून ठेवणे म्हणजे मुलांना एक प्रकारे स्पर्धेला जुंपणे आहे आणि ते विचित्र आहे. म्हणून एकाच परीक्षेतून मुलांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्याच्याऐवजी ते रोज करावे असे एनसीआरटीने सुचविले आहे. आपल्या घरात नव्या सुनबाई आल्या तर तिच्यातील गुण, तिची काम करण्याची पद्धत कशी आहे हे एकाच दिवसाच्या परीक्षेवरून आपण ठरवतो का? नाही, ती रोज कशी वागते, तिची काम करण्याची पद्धत कशी आहे, ती बोलते कशी यावरून ती कशी आहे हे आपण ठरवतो. तिला जर अमुक एक गोष्ट येत नसेल तर ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि शिकवतो. तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीतही झाले पाहिजे. त्याच्या ज्ञानाचे मूल्यांकन इतक्या सहजपणे झाले पाहिजे जिथे ते कमी आहे असे जाणवते तिथे प्रयत्नपूर्वक पद्धतीने ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्याच्या समोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. हिच खरी शिक्षणाची योग्य पद्धत आहे.

विनोबांनी तर स्पष्टपणे सांगितले आहे की मुलांना पुस्तकांपासून दूर ठेवा, त्यांना जगापासून शिकू द्या, त्यांना मुक्तपणे अनुभव घेऊ द्या; त्यामुळेच आपण जुन्या, ठोकळेबाज विचारसरणीतून बाहेर पडण्याची गरज आहे. जागतिकीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली स्पर्धा, बदलत्या तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जाणारे विद्यार्थी तयार करायचे असतील, तर जुनी साचेबद्ध, केवळ पुस्तकांवर अवलंबून असलेली शिक्षण पद्धती आता बदलावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची कलात्मकता, संशोधक वृत्तीला चालना देणारी प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे. यासाठी शिक्षकांनाही सध्याच्या साचेबद्ध शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या