बाळाचं गुपीत

बाळाचं गुपीत

पुंजाजी मालुंजकर,

विनायकरावांचे वडिलोपार्जीत जुने घर पडले होते. पुन्हा तेच घर नव्याने बांधण्यापेक्षा आपणसुद्धा इतरांप्रमाणे शेतावरच घर बांधावे आणि तेथेच राहावे म्हणजे गाई, वासरे, बैलांकडे व पिकाकडेही लक्ष देता येईल. असा विचार करून त्यांनी आपल्या शेतातच थोड्या उंच जागेवर असलेल्या एका कोपर्‍यात चार-पाच महिन्यांच्या कालावधीत तीन खोल्यांचे एक टूमदार घर बांधले होते. पुढे गॅलरीप्रमाणेच प्रशस्त बांधीव ओटा, शेतीला सर्व बाजूने तार कंपाऊंड असल्याने त्या घराची सुंदरता अधिक वाढली होती.

सांबरगाव. सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले शंभर-सव्वाशे घरांचे छोटेसे गाव. शहरापासून दूर व कसल्याही सुविधा नसलेले एक उपेक्षित खेडे. हा परिसरच विकासापासून दूर असलेला. धड रस्ते नाहीत, त्यामुळे दळणवळणाची साधने नाहीत. उद्योगधंदे नसल्याने सुशिक्षित तरुण शहराकडे धाव घेत व तिकडचेच रहिवासी होत होते.

त्यामुळे गावातील लोकसंख्या घटू लागली. ज्यांना बाहेर काम मिळाले नाही असे उर्वरित वयोवृद्ध गावकरी आपापल्या शेतावरच घरे बांधून राहू लागले. गाव खेड्यात शेतातून येणार्‍या अल्प उत्पन्नावरच वर्षभर गुजराण करायची होती. कसलेही शौक, सुविधा नाहीत. टीव्ही नाहीत, इंटरनेट नाही. सत्तर वर्षांपूर्वीची परिस्थिती आजही कायम होती.

शेतावरच राहत असल्याने इतर करमणुकीची साधने नव्हती. त्यामुळे शेतातील कामांचा उरक वाढायचा. डांगरगावातील साठ-सत्तर शेतकरी शेतातच वस्ती करून राहू लागल्याने गाव कसे सुनेसुने, ओसाड पडल्यागत आशाळभूत नजरेने शांतपणे उभे असलेले दिसायचे.

नाही म्हणायला गावात सातवीपर्यंत शाळा असल्याने, संध्याकाळी पाचपर्यंत गाव जिवंत वाटायचे. मात्र त्यानंतर भयाण शांतता पसरायची. गाव असूनही एकटे व असुरक्षित वाटायचे. शाळेतील विद्यार्थीही शाळा सुटल्यावर आपापल्या शेतातील वस्तीवर निघून जात होते.

दोनही मुले नोकरीकरता शहरातच राहूु लागल्याने विनायकराव व शारदा काकूंनाही गावात करमेना. त्यातच राहत्या घराची भिंत पडल्याने त्यांनीही आपला मोर्चा शेताकडेच वळवला अन् पाच दिवसांपूर्वी त्याच नवीन घराची वास्तुशांती करून झाली होती.

दोन्ही मुले, सुना, नातू, कार-जावई, भाऊबंद असे सर्वजण आले होते. पाच ब्राह्मणांनी नवग्रह शांती, वास्तुपूजा, होमहवन केले. चार पाचशे लोकांना अन्नदान करून झाले. सर्व काही व्यवस्थित पार पडले. सर्व पै पाहुणे तृप्त होऊन आपापल्या गावी परतले. विनायकराव व शारदा काकूही खूश होते.

निसर्गाच्या सान्निध्यात हा हवेशीर परिसर त्यांना आवडला होता. काल दोन्ही मुलेही आपल्या बायका-मुलांना घेऊन आपापल्या कामाच्या ठिकाणी निघून गेले अन् आज मुलगी शकुंतलाही तिच्या नवर्‍यासोबत सासरी गेली. ती जाताना आई-बाबांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मुले निघून गेले. याचे त्यांना काहीच वाटले नाही, मात्र मुलगी सासरी जाताना बापाच्या डोळ्यांतले पाणी कां पाझरते? याची माहिती त्यांनाही सांगता आली नसती. विनायकराव शांतपणे विचार करत होते.

पाच-सहा दिवसांपासून पाहुण्यांच्या हसण्या- खिदळण्याने भरलेले घर आज एकदम शांत झाले होते. आवाज, गोंगाट, आदळ-आपट सर्व बंद झाले होते. आता घरात होते विनायकराव अन् शारदा वहिनी. शिरपा गडीही दोन दिवसाच्या बोलीवर कालच त्याच्या वाडीवर गाव जत्रेला गेला होता. तो उद्या येणार होता.

त्यामुळे जवळच असलेल्या गोठ्यात जाऊन त्यांनी गाई-वासरांना पाणी पाजून गव्हाणीत चारा टाकला होता. दोन्ही खिल्लारी बैलांनाही पाणी पाजून त्यांना चारा टाकला. त्यांच्या पाठीवर थोडे थोपटले अन् ते जवळच असलेल्या शिरपाच्या बंद खोलीकडे नजर टाकून पुन्हा घराकडे परतले.

नुकताच सूर्य मावळला होता. संध्याछाया दाटायला लागल्या होत्या. त्यांनी अंगणातच खाट टाकून त्यावर बैठक मारली. शेजारीच वाघ्या कुत्रा शेपटी हलवत मालकाच्या हुकमाची वाट पाहत बसला होता. शारदा वहिनी स्वयंपाकघरातच रमल्या होत्या. दहा वर्षांपूर्वी शेताला चहुबाजूंनी तारेचे कुंपण घातले होते. त्यामुळे चुकारी जनावरे शेतात घुसत नव्हते. पश्चिमेच्या

कोपर्‍यात विहीर खोदली होती. तिला बर्‍यापैकी पाणी लागले होते. त्या पाण्यावरच त्यांच्या तीन एकर शेतात खरीप हंगामात भात अन् रब्बीत गहू अशी दोन पिके ते घेत होते. विहिरीजवळच्या बांधावर दोन नारळाची झाडे, तीन आंब्याची झाडे दहा वर्षांपूर्वीच लावले होते.

तीन वर्षांपासून आंब्याला भरपूर आंबे येतात, मात्र नारळाच्या त्या दोन्ही झाडांना यावर्षी प्रथमच भरपूर नारळे लगडली होती. दोन्ही झाडांना साठ-सत्तर नारळे नक्कीच असतील, असे शकुंतला काल म्हणाली होती. याचा अर्थ तिला नारळे पाहिजे होती, हे विनायकरावांनी ताडले होते. पण या उंच झाडावर कोण चढणार? हा प्रश्न त्यांना सतावत होता.

आज सकाळीच रानातील बाभळीच्या काड्या तोडून त्यांचा बंडल मुंबईला ‘दातून’ करण्यासाठी पाठवणारा काड्यावाला दिवसा सर्व शोधूनही काहीच सुगावा लागेना तसे सगळेच विचारात पडले. मनात निरनिराळ्या शंकांची वादळे उठू लागली. ‘माझे ऐका, हे लक्षण काही ठीक दिसत नाही, एखादा ब्राह्मण अगर ज्योतिषी किंवा भगताकडे जाऊन या! ते काही मार्ग तरी सांगतील!’ शारदा काकूंनी सुचवले.

‘तू म्हंती तसं करू, पण मला वाटते आजचा दिवस थांबून वाट पाहू अन् पुन्हा आवाज आलाच तर उद्या ब्राह्मणगावला मी स्वत: सकाळीच जाऊन येतो. कदाचित काल रात्री प्रथमच आलेला तो आवाज दुरवरून हवेच्या झुळूकेनेही ऐकायला येऊ शकतो!’ विनायकराव म्हणाले, अन् ते दोघेही घराकडे परतले. शिरपा त्याच्या खोलीकडे गेला होता. रात्री तमाशाचे जागरण

झाल्याने त्याने आता झोपणेच पसंत केले होते. संध्याकाळी शारदा काकूंनी लवकरच स्वयंपाक उरकला. त्यामुळे सर्वांचीच जेवणं उरकली व रात्री आठ वाजेच्या आत ते बाहेरच्या अंगणात येऊन बसले. वाघ्याही कान टवकारून तयारीत बसला होता.

विनायकराव बॅटरी अन् काठी जवळ घेऊनच खाटेवर बसले होते. शिरपाही एक दांडुके घेऊन उभाच होता. आवाज ऐकल्याबरोबर तो त्या दिशेने धावणार होता. शारदा काकूही उंबर्‍याजवळच उभी राहून कानोसा घेत होती. आज त्यांना त्या बाळाचा शोध घ्यायचाच होता.

भतीवरल्या घड्याळात आठ वाजले तसे विनायकराव सावध झाले. आता कोणत्याही क्षणी तो आवाज ऐकू येणार होता. कारण काल रात्री आठ-साडेआठच्या मध्येच त्या बाळाचा आवाज आला होता. आजही आलाच तर तो त्याचवेळेस येणार होता. उत्कंठा शिगेला पोहोचत होती. पाच मिनिटे गेली, दहा गेली अन् राईट आठ वाजून बारा मिनिटांनी ‘हँऽऽ! हँऽऽ! हँऽऽ!’

बाळाचा हसण्याचा आवाज सुरू झाला. प्रथम हळू अन् लगेचच मोठ्याने बाळ खदखदून हसायला लागले. त्या आवाजानेही शारदा काकूंच्या अंगावर भीतीने काटाच उभा राहिला. आपण मळ्यात राहायला येऊन चूक तर नाही ना केली? असे एक-दोन प्रश्न त्यांच्या मेंदूत थैमान घालू लागले.

वाघ्या अन् शिरपा आवाजाच्या दिशेने लगेच धावले. विनायकरावही बॅटरी चमकावत व काठी आपटत विहिरीच्या दिशेने वेगात निघाले. शारदा काकू मात्र तिथेच खुंटावल्याप्रमाणे उभ्या राहिल्या. ‘कदाचित एखाद्या कुमारी मातेने कर्णाप्रमाणे ते बाळ आपल्या विहिरीत टाकले तर नसावे ना?’ त्यांचेही विचार चक्र सुरू झाले होते.

पण पुन्हा कालच्याप्रमाणेच आजही घडले. पंचवीस-तीस पावले जाईपर्यंत बाळाचा आवाज एकदम बंद झाला. शिरपाचा पळताना पाय अचानक लचकल्याने त्याच्या पळण्यावर मर्यादा पडल्या. तो जागेवर पोहोचेपर्यंत आवाज थांबला होता.

पुन्हा कालच्याप्रमाणेच विहिरीच्या आसपास, आंब्याच्या व नारळांच्या झाडांवर बॅटरी चमकवली, पण काहीच आढळले नाही. एक घटना मात्र घडली. अलीकडच्या आंब्याच्या झाडावर असलेला कावळ्यासारखाच परंतु किंचीत लालसर व लांब शेपटी असलेला कोकीळ पक्षी पलीकडच्या आंब्याच्या झाडावर जाऊन पानाआड लपला होता. तेवढीच हालचाल त्या शांत अंधारातही भेसूर वाटत होती. कालच्याप्रमाणेच आजही काहीच सुगावा न लागल्याने विनायकराव जड पावलांनी पुन्हा घराकडे वळाले.

‘का हो, लागला काही तपास?’ शारदा काकूंनी काळजीनेच विचारले.

‘कसा लागणार? आम्ही तिथे जाईपर्यंत आवाज एकदम बंद होऊन जातो. एक-दीड मिनीट, बाळ तीन-चार वेळा खदखदून हसते अन् एकदम गप्प होते. नक्की काय भानगड आहे हेच समजत नाही?’ विनायकराव हताशपणे म्हणाले.

‘मला तर बाहेरची बाधा झाल्याचाच संशय येतोय. कोणी काही करणी तर नाही केली आपल्या मळ्यावर? ते काही नाही तुम्ही उद्याच त्या भगताला गाठून याचा बंदोबस्त करून घ्या बरं!’ शारदा काकू म्हणाल्या.

‘होय, मलाही तसेच वाटते शारदा! मी उद्याच त्या भगताकडे जातो, मग तर झाले!’ विनायकराव खाटावर बसत म्हणाले.

ती रात्र कशी तरी पार पडली. सकाळ झाली तसे विनायकराव मळ्यातून ब्राह्मणगावच्या दिशेने निघाले. या भागात रस्ते नसल्याने दळणवळणाची साधनेही नव्हती. त्यामुळे पाच- सहा किलोमीटर पायीच जावे लागणार होते. सकाळी अकरा वाजेच्या आत ते ब्राह्मणगावला पोहोचले. बाळू भगताचे घर गावाच्या विरुद्ध टोकाला होते. ते तडक तेथे गेले. बाळू भगत कुठेतरी जाण्याच्या तयारीत दिसला. ‘राम राम’ झाल्यावर भगताने विचारले, ‘बोला काय काम काढले पाटील?’

‘आमच्या मळ्यात दोन दिवसापासून बाळाचा खदखदून हसण्याचा आवाज येतो. पुष्कळ शोधले पण आढळून येत नाही. त्याकरिता तुमची मदत मागायलाच आलो होतो!’ विनायकराव म्हणाले.

‘म्हंजी, भानामतीचाच प्रकार म्हणा की? आवाज कधी आणि किती वेळ येतो?’ भगताने विचारले.

‘रात्री आठ ते नऊच्या दरम्यान एकदाच आवाज येतो व तोसुध्दा मिनीट-दोन मिनीट!’ विनायकरावांनी सांगितले. नाही ते! निदान आता तरी फोन करा! शारदा काकू म्हणाली.

‘बरं करतो त्याला फोन!’ असे म्हणून विनायकरावांनी मोठा मुलगा अशोकला फोन लावला. अशोक नाशिकच्या एका मोठ्या कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करत होता. तो नुकताच कामावरून घरी परतला होता. तेव्हढ्यात बाबांचा फोन पाहून त्याने पटकन उचलला.

‘हॅलो बाबा! कसे आहात? आईची तब्येत बरी आहे ना? सगळ काही ठीक आहे ना?’ त्याने घाईनेच विचारले. ‘सर्व काही ठीक आहे अशोक! पण एक प्रॉब्लेम झालाय!’ विनायकराव म्हणाले. ‘काय झालय बाबा? मला सविस्तर सांगा पाहू?’ अशोकने विचारले.

विनायकरावांनी सर्व सांगितले. बाळू भगत आणि चंद्रात्रे गुरुजींनी सांगितलेले, सर्व घटनाक्रम सांगितला. ‘तुम्ही काहीच काळजी करू नका बाबा! भगताला अगर दुसर्‍या कोणालाही बोलावू नका! मी आणि माझा मित्र उद्या सकाळी दहा-अकरा वाजेलाच मोटारसायकलने तिकडे येऊ! उद्याचा मुक्काम करून तो विषय संपवूनच परत फिरू! आईला धीर द्या! आम्ही उद्या येणारच आहोत तेव्हा बोलू! ठीक!’ अशोकने आश्वासन देऊन फोन बंद केला.

‘अशोक त्याच्या मित्राला घेऊन उद्याच येतो म्हणालाय!’ विनायकरावांनी शारदा काकूला सांगितले.

‘ऐकलेय मी सगळे!’ काकू म्हणाल्या.

‘मग मी उद्या बाळू भगताला आणायला जाऊ नको का?’ त्यांनी विचारले.

‘अशोकने सांगितले ना कोणालाही बोलावू नका! मग नका जाऊ! करू द्या त्याला काय करायचे ते!’ काकूंनी समजावले तसे विनायकराव शांत बसले.

रात्रीची जेवणं उरकली. विनायकराव काठी व बॅटरी घेऊन तयारीनिशी त्या आवजाची वाट पाहत खाटेवर बसले होते. शिरपा गडी विहिरीजवळच टेंभा पेटवून बसला होता. निदान आवाज विहिरीतूनच येतो किंवा कसे? हे तरी समजणार होते आणि आजही तो आवाज आलाच होता. बाळ खदखदून हसले. ‘हँऽऽ! हँऽऽ! हँऽऽ!’ एकदा नाही दोनदा हसले अन् लगेचच आवाज बंद झाला. विनायकराव चपळाईने उठून शिरपाकडे निघाले. शिरपा झाडांच्या दिशेने टेंबा फिरवत होता. टेंब्याच्या

लालसर प्रकाशात त्याने झाडांच्या फांद्या अन् फांद्या तपासल्या, पण कुठेच काही नजरेला आढळले नाही.

‘काय रे शिरपा! कुठून आला होता आवाज?’ विनायकरावांनी विचारले. ‘विहिरीतून आला होता का? तू तर इथेच बसला

होतास ना?’

‘आवाज विहिरीतून नाही या झाडांच्या वरून आभाळातून आल्यासारखा वाटले धनी, पण त्याचा प्रतिध्वनी विहिरीतही उमटला. म्हणून मी समदी झाडे बुंध्यापासून तर शेंड्यापर्यंत तपासली पण काहीच गावले नाही बघा!’ शिरपाने खुलासा केला.

‘म्हंजी भगताने दिलेला लिंबू कापून टाकल्याने विहिरीतले भुताड वर आभाळात तर नाही ना गेले? नाही तर दुखणे असेल वेगळे अन् आपण उपाय करतो दुसरीकडे, असे तर होत नसेल?’ विनायकराव स्वत:शीच पुटपुटले.

‘मला काही म्हणाले का धनी?’ शिरपाने विचारले.

‘नाही! उद्या अशोक त्याच्या मित्रासोबत येतोय. पाहू, त्याचाही सल्ला घेऊ! मग पुढला निर्णय घेऊ! चला आता! जनावरांना चारा टाकून मग जा झोपायला!’ त्याच्या उत्तराची वाट न पाहता ते घराकडे परतले.

‘बाहेर उभ्या असलेल्या शारदा काकूंनी तोच कालचा प्रश्न विचारला अन् विनायकरावांनीही तेच कालचेच उत्तर तिला ऐकवले.

‘म्हंजी, तोच प्रश्न अन् तेच उत्तर! त्यात काहीच फरक पडला नाही का? हे असे किती दिवस चालायचे?’ शारदा काकुंनी काळजीने विचारले.

‘होय ते खरे आहे! पण आज समजले की, बाळाचा तो आवाज विहिरीतून येत नाही तर तो आभाळातून व झाडांच्या मधून येतो, असे शिरपाने सांगितले.’ विनायकरावांनी सांगितले.

‘तेवढे तरी बरे झाले. नाही तर उद्यापासून त्या विहिरीचे पाणी प्यायचेच नाही, असा विचार मनात घोळत होता.’ शारदा काकू म्हणाल्या.

‘खर आहे ते! मन चिंती ते वैरी ना चिती!’ असे म्हणतात ते खोटे नाही. आता उद्या अशोक काय म्हणतो ते पाहू!’ असे म्हणून विनायकरावांनी खाटेवरला बिछाना नीटनेटका करून त्यावर बसले. तशा शारदा काकूही आतल्या माजघराकडे वळाल्या.

दुसर्‍या दिवशी अशोक व त्याचा मित्र विजय मोटारसायकलवर सांबरगावला येऊन पोहोचले. त्यांनी मळ्यात आल्यावर प्रथम विहिरीचा परिसर नजरेखाली घातला. विहिरीत दीड-दोन परस पाणी साठलेले होते. जवळच्या बांधावर दोन आंब्याची झाडे होती. ‘अरे गधाभाऊ, बरे झाला तू आलास. तू तुझी काही वस्तू त्या नारळाच्या झाडावर ठेवलीस का? विनायकरावांनी उत्सुकतेने विचारले.

‘होय! माझा मोबाईल त्या दिवशी तेथेच राहून गेलाय. त्यासाठीच मी आज इकडे आलोय!’ गिधाभाऊने खुलासा केला. ‘आणि त्या मोबाईलची रिंगटोन बाळ हसण्याची लावली वाटते!’ विजयने विचारले.

‘अगदी बरोबर! म्हणजे तो मोबाईल काढला का तुम्ही? त्या दिवशी नारळ काढताना तो खिशातून पडू नये म्हणून मी झाडावरच एका कप्प्यात तो ठेवला. पण खाली उतरताना तो घ्यायला विसरलो. हे माझ्या लक्षातच आले नाही. दातूनच्या काड्यांचा बंडल घेऊन मी पॅसेंजरने कल्याण स्टेशनवर संध्याकाळी उतरलो.’ गिधाभाऊ सांगत होता. ‘हा माझा भाऊ कल्याणलाच राहतो. तिकडे दातून विक्रीची जबाबदारी त्याचीच. यालाच फोन करण्यासाठी मी खिशात हात

घातला तेव्हा लक्षात आले फोन हरवला म्हणून!’

‘मग मी तो काड्यांचा भारा तसाच उचलून निघालो. पण चालताना पाय मुरगळला. तरीही मी तसाच लंगडत याच्या खोलीपर्यंत पोहोचलो. माझा फोन न आल्याने हा घरीच होता. त्याला मी फोन हरवल्याचे सांगितले. याने लगेच माझ्या फोनवर फोन केला. फोनची रिंग वाजल्याने जिथे असेल तेथे तो सुरक्षित असल्याची खात्री पटली अन् मी निश्चिंत झालो!’ गिधाभाऊ सांगत होता.

‘किती वाजले असतील तेव्हा?’ अशोकने विचारले. ‘तेव्हा नुकतीच आठ वाजेची लोकल निघून गेली होती. म्हणजे सव्वाआठची वेळ असेल!’ गिधाभाऊने सांगितले. ‘मग रोज रात्री त्याचवेळेस बेल वाजवायचे कारण काय?’ विनायकरावांनी विचारले.

‘ते होय! हा आमचा भाऊ सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडला की रात्री आठच्या लोकलनेच घरी यायचा अन् मग मी त्याच्या फोनवरूनच रिंग देऊन आपला फोन कोणाच्या हाती लागला किंवा कसे? याची खातरजमा करत होतो अन् फोनची बॅटरी संपू नये म्हणून एक-दोनदा रिंग वाजली की लगेच बंद करायचो!’ गिधाभाऊने सविस्तर माहिती सांगितली.

तोपर्यंत शारदा काकूंनी गिधाभाऊ अन् त्याच्या बंधूसाठी चहा आणला. तो त्यांनी घेतला. ‘मग आता चला; तो मोबाईल खाली काढून आणा व आई-बाबांना ती रिंगटोन वाजवून दाखवा म्हणजे त्यांची खात्री पटेल!’

अशोक म्हणाला तसे ते सर्वजण त्या नारळाच्या झाडाजवळ गेले. पाय दुखत होता तरी गिधाभाई झरझर झाडावर चढला अन् तो मोबाईल काढून दाखवला. तेवढ्यात विनायकराव म्हणाले, ‘आता वर चढलाच आहे तर पुन्हा दहा-बारा नारळं पाहुण्यांसाठी काढून खाली टाक गिधाभाऊ!’

गिधाभाऊनी आजही पंधरा नारळं तोडून खाली टाकले अन् तो खाली उतरला. खाली उतरल्यावर अशोकच्या फोनवरून त्या फोनची रिंग वाजवली. बाळ पुन्हा खदखदून हासू लागले. एकदा, दोनदा, तीनदा! तोच आवाज आल्याने विनायकराव व शारदा काकूंची खात्री पटली. अन् त्यांनी उसासा टाकला. मागील पाच दिवस त्यांची भूक, तहान, झोप, समाधान सर्व उडाले होते. त्या आवाजाचे अन् बाळाचे गुपीत त्यांना आज उलगडले होते.

आपला मोबाईल मिळाल्याच्या आनंदात गिधाभाऊ अन् त्याचा भाऊ दोन नारळं घेऊन हसत हसतच निघून गेले. विजय अन् अशोकही आपण येऊन आई-बाबांची भीती व अंधश्रद्धा दूर केल्याने समाधानी होते. तेही जेवण करून पाच-सहा नारळं घेऊन पुन्हा नाशिकला परतले.

एका मोठ्या संकटातून अशोक आणि विजयच्या मदतीने मुक्त झाल्याचा आनंद विनायकराव व शारदा काकूंच्या चेहर्‍यावर दिसत होता. चंद्रात्रे गुरुजींचा ठोकताळा मात्र बरोबर जमला होता अगदी तसेच घडले होते. भगताला मात्र नाहक दोनशे रुपये दिल्याची त्यांना रूखरूख लागली होती. त्याने दिलेले ते दोन लिंबं दोनशे रुपयांना पडले होते. चालायचंच! मनाच्या समाधानासाठीसुद्धा असा एखादा अनुभव विकत घ्यावा लागतो असे म्हणतात ते काही खोटे नव्हते. विनायकरावांनी स्वत:च स्वत:ची समजूत घातली होती.

वाडीवर्‍ह, ता. इगतपुरी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com