Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedसफर मुरूड जंजीरा अलीबाग अन् गणपती पुळे...

सफर मुरूड जंजीरा अलीबाग अन् गणपती पुळे…

विलास पंचभाई

हिवाळ्याचे दिवस..पहाटेची थंडी म्हणजे अंगाला

- Advertisement -

झोंबणारा वारा…अहा..अशा थंडीत उठायचं म्हणजे जरा..कसरतच ना..पण कुठे ट्रीपला जायचं म्हटलं की, उत्साह संचारतो….असेच आम्ही अपार्टमेंटमधले काही लोकं सफरीसाठी निघालो..

मिनी बस केली होती. पहाटेच निघाल्यामुळे बसमधे बसल्या बसल्या झोप लागली…छान भक्तिगीत लावले होते..

ओंकार स्वरूपा…सद्गुरू समर्था..अनाथांच्या नाथा तुज नमो तुज नमो……हा…सुरेश वाडेकरांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा…अशात कळले नाही की, अलीबाग कधी आले….आम्ही अलीबागला उतरलो…सर्वच डोळे चोळत चोळतच उतरले…आम्ही एका साईराम हॉटेलवर गाडी थांबवली होती..तिथेच चहा-पाणी-नाष्टा झाला….

अलीबागला आल्यावर आम्ही चौपाटीवर गेलो..

चौपाटीवरचा समुद्रलाटा आमच्या स्वागताला सज्ज होत्याच…अलीबागचा समुद्र किनारा मच्छिंचा वास नाकात भरला…कसे रहात असतील इथले लोकं..सहज मनात विचार येवून गेला…लहान मुल बायका माणसं

समुद्रा जवळ गेल्या..गेल्या भिजण्याचा मोह आवरला नाही..सर्वांनी एकदम उड्या मारल्या व चिंब भिजून घेतले खार्‍या पाण्यात….तास भर भिजून झाल्यावर ही मन भरेना..वरून ऊन असल्यामुळे पाण्यात छान वाटत होते…पोरांना ओरडून बाहेर काढले..व जवळच गरम

गरम भजी तळणार्‍या गाड्यावर गेलो..मस्त सर्वांनी ताव मारला…चहा चा फुर्का मारला व परत..सर्वजण बस मध्ये बसलो..कारण..संध्याकाळपर्यंत गणपती पुळेला पोहोचायचं होतं….

गणपती पुळे हे फक्त नवरा माझा नवसाचा पिक्चरमध्येच पाहिलं होतं. आज पहिल्यांदाच योग आला

जाण्याचा…गाडी गणपती पुळ्याच्या दिशेने जाऊ लागली तशी घनदाट वृक्ष डोंगर आणि गार हवा

किती छान वातावरण होतं..वा..खरंच कोकण पाहाण्यास का जावं हे मनोमन पटलं होतं..कोकण महाराष्ट्राच काश्मिर म्हटल्यास वावगे ठरू नये..

उंच उंच ताड माडची झाडे सुपारीच्या बागे मध्येच फेसाळणारे समुद्र किनारे….अशात सूर्य मावळला होता..मग आमची बस आणि अंधार एवढच शिल्लक होतं….कारण सिंगल वाहतूक व रूंद रस्ते त्यामुळे एका वेळी एकच वाहन जात होतं..मग सुरू झाल्या गाण्याच्या भेंड्या..अंताक्षरी लहान मुलं ही सामील झाले…अशात काही झोपले…काही डुुलक्या घेऊ लागले व आठ वाजता..गणपती पुळ्याला पोहोचलो…उतरल्यावर आम्ही आधी चहा घेतला. मग बस पार्किंगला लावून दोन जणांनी राहाण्याची व्यवस्था

केली…मस्त एक लमसम हॉल मिळाला..त्याच्यात आमच्या पाच फॅमिली मस्त मावतील असे…

मग आम्ही फ्रेश झालो व जेवायला गेलो..कोकणातलं जेवण म्हणजे मासे व सोल कढी….जेवण झाल्यावर आम्ही समुद्र किनार्‍यावर फेरफटका मारला…फक्त अंधार आणि अथांग शांत समुद्र व खळखळणार्‍या लाटा.. किनार्‍याला धडकत होत्या..हे दृश्य पाहाण्याची मजा वेगळीच…..सकाळच्या प्रवासामुळे रात्री सर्वच पडता बरोबर झोपले…

मी व माझे मित्र डिके आहेर सकाळी लवकर म्हणजे पहाटेच उठलो व समुद्र किनारा पाहून आलो. छान समुद्रात डुबकी मारून गणपतीच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घेतले व आरती ही साधली..आणि मस्त फक्कड चहा घेतला व समुद्राचा पहाटेचा नजारा पाहात बसलो..

सकाळचे आठ वाजले..रूमवर तयारी सुरू होती.

सर्वांनी रूमवरच स्नान केलं. मग आम्ही सर्व मंडळी

गणपती पुळेच्या नवसाच्या गणपतीला दर्शनासाठी गेलो

डिके, राजेश,बागूल, नारायण त्यांची फॅमिली असे सर्व

12/13 लोक होतो..मंदिराचे विशिष्ट प्रकारचे बांधकाम

व सुमुद्र किनार्‍याची तटबंदी लक्ष वेधून घेते…दर्शन घेतल्यावर आम्ही बीचवर गेलो…सर्व फॅमिलीने समुद्रात भिजायचा आनंद घेतला…खूप वेळ पाण्यात राहूनही मन भरत नाही.. लाटेबरोबर आपणही बाहेर फेकलो जातो व ओढलो जातो..हे या किनार्‍यावरचे वैशिष्ट्य…कारण इथे पाण्याला खूप ओढ आहे…दोन तास मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही नाष्टा केला…कारण आम्हाला दोन दिवसांत सर्व कोकण पूर्ण करायचा म्हणून आम्ही जेवणात जास्त वेळ घालवला नाही….गणपती पुळ्याहून आम्ही मुरूड-जंजीरा येथे गेलो…मरूड म्हणजे शिवकालीन किल्ला येथे आहे..

व त्या वेळस शिवाजी महाराजांचे अरमार होते…

सर्व मच्छिमार व मुस्लीम लोकांचे जास्त वास्तव्य, पण खरे शिवाजी महाराजांचे मावळे…जीवाला जीव देणारे

मग आम्ही समुद्रातून जंजीराचा किल्ला पाहाण्यासाठी गेलो..हा किल्ला मोगलांना कधीच ताब्यात घेता आला नाही..किल्ल्याला समुद्रातच लाटा धडकतात, पण हा किल्ला अभेद्य..एक उत्कृष्ट वास्तूव्यावस्थापनाचा नमुना…या किल्यातून 23 ज्ञा

चा भुयारी मार्ग जंजीरापर्यंत जातो..हे विशेष.

किल्ल्याचे वैभव पाहिल्यावरच कळते. जवळपास तेवीस तोफा तिथे आहेत..किल्यावर विजयस्तंभ आजही अस्तित्वात आहे..यावरूनच शिवरायाची पराक्रमाची

व शौर्याची गाथा कळते…किल्ला बराच भंग झालाय पण..किल्ला संवर्धन मंडळाकडून ऐतिहासिक किल्लेजतनाचे काम चालू आहे…

अशा प्रकारे जंजीरा पाहिला. इथे राऊंड टोपी छान मिळतात. या टोप्या घालून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही..आम्ही भरपूर फोटो काढले…

व पुन्हा जहाजातून परतीच्या प्रवासाला निघालो..

जंजीर्‍याला….माश्याशिवाय खाद्यच नाही वासानेच पोट भरतं….या सर्व आठवणी मनात ठसवून आम्ही परत नाशिकच्या परतीच्या प्रवासाला निघालो…..

नाशिक

7774955892

- Advertisment -

ताज्या बातम्या