Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedडिजिटल प्लॅटफॉर्म आणि तरुणाई

डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तरुणाई

शमिका खुशाल कारीया

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायच्या आधी संपूर्ण जग हे “चीनीमय” होतं. एकप्रकारे चिनी वस्तूंचे म्हणा किंवा चिनी लोकांचे गुण गानच गाईत होतो, चिनी किती हुशार आहेत.

- Advertisement -

कमीतकमी किमतीत एखाद्या खेळणीपासून ते एखादं यंत्र बनवून आयुष्य किती सुकर केलंय, मग तो मोबाईल फोन असुदेत किंवा त्यातील वेगवेगळी ऍपस, जस की, सर्वात जास्त गाजलेल Tik-tok, like etc..अजूनही काही प्रमाणात का होईना या चीनीचा आणि त्यांनी बनवलेल्या या ऍप चा प्रभाव आहेच. Tik-Tok या ऍप ने तर संपूर्ण जगाला वेड लावलं होतं.
Tik-Tok, likee यासारख्या चिनी अँपचा लाखो भारतीय वापर करत होते,
भारतात हे अॅप जरी बंद करण्यात आलं असलं तरी अजूनही याची craze काही कमी झालेली नाही. या अॅप ने तर अक्षरशः लहानापासून ते मोठ्यांपर्यंत वेड लावलं होतं, त्यातही सर्वात जास्त क्रेझ होती ती आजच्या तरुणाईची. यातही १३ वर्षा खालील मुलांना हे अँप वापरण्याची परवानगी नव्हती तरीही सर्वे नुसार सगळ्यात जास्त हे अँप वापरणाऱ्यांची संख्या ही १३ वर्षांखालील होती. त्यामुळे हे अँप जेव्हा ban करण्यात आलं तेव्हा सर्वात जास्त हिरमोड झाला तो या तरुणाईचा, कारण या tik tok मुळे त्यांना आपलं कौशल्यच दाखविता येत होतं तसेच जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि पैसे कमविण्याचे हे साधन होतं. जितके जास्त followers, likes, shares असतील तितकी जास्त प्रसिद्धी त्यासाठी वाटेल ते करायचे. काहींना यातून प्रसिध्दी, फेम, आणि पैसे ही मिळालेत आणि ते tiktok star म्हणवू लागलेत. कुठल्याही सेलिब्रिटी पेक्षा कमी काय तर ते स्वतः च सेलिब्रिटी झालेत. पण काही तरुणाई मात्र या tiktok मुळे आपले मानसिक स्वास्थ हरवून बसली. काही दिवसांपुर्वी पर्यंत हे tiktok अँप तरुणांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होता. ही तरुणाई यात इतकी गुरफटून गेला होता की, आपण काय करतोय? कशासाठी करतोय? याचे भान हरवून बसला आहे, लाईक, followers, share करण्याच्या नादात आज ही तरुण पिढी आपल्या जीवाची पर्वा न करता बेभानपणे वागतात. त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता like आणि share पुरतीच मर्यादित राहिली आहे.
डॉक्टर ए. पी. जे. कलाम म्हणायचे, आपल्या देशाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे, आजचा तरुण वर्ग आहे. ज्या युवा वर्गाकडून आपल्याला “सुजलाम सुफलाम राष्ट्र” निर्मितीची अपेक्षा आहे तोच तरुण आज आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर व्यर्थ करत असेल तर कसे होणार? आजचा युवावर्ग हा विरंगुळा म्हणून PUBG व TIKTOK सारख्या गोष्टीच्या नादी लागून दिवसाच्या २४ तासांपैकी अर्धा वेळ यात घालवतोय, या युवकांनी जनिवतेचा, माणुसकीचा, एकाग्रतेचा धडा देणारे स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेण्याऐवजी tiktok अप वरील जास्त लाईक मिळवणाऱ्या तरुणांना फॉलो तर करतोच आणि त्याच्या सारखं वागून आपला आदर्श मानायला लागलाय आहे. याचा अतिरेक इतका झाला होता की, त्यांचं त्यांच्यावरच संतुलन राहिलेलं नाहीये. या सर्वातून कधीकधी असं जाणवतं की, तंत्रज्ञानाने आपल्याला नवनवीन यंत्र दिलेत पण ते वापरण्याचं योग्य ते भान दिलं नाही. या चिनी अप मुळे म्हणा किंवा सोशल मीडिया च्या अतिरेकामुळे चांगलं काय किंवा वाईट काय ह्याचा विचार च कोणी करत नाहीये,
असं अजिबात नाही आहे की, हे ऍप किंवा सोशल मीडिया सर्वांसाठी घातकच असेल, खरं तर हे प्रत्येक व्यक्तीच्या फायद्यासाठी च निर्माण झालंय यात शंका नाहीये, मात्र त्याचा उपयोग कमी दुरुपयोग जास्त होतोय, काही प्रमाणात हा बदल चांगला आहेच पण अपेक्षेपेक्षा जास्त बदल नक्कीच घातक असेल. कारण यामुळे कुठेतरी या सगळ्यांमुळे चहा- कॉफी पीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्याची, हातावर टाळी देऊन फिदीफिदी हसण्याची, स्वतः च्या आनंदासाठी जगायची मज्जा कमी झालेली आहे.
आजच्या तरुणाईला हे कधी कळेल की, “we don’t need followers, we need Ideals”
डिजिटल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. त्याची ही ओळख जपणे गरजेचे आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे असे दिसते . आज गरज आहे ती फक्त तरुणांनी या डिजिटल मीडियाचा अतिरेक न करता मर्यादित व योग्य वापर करण्याची! असे झाले तरच डिजिटल मीडिया आजच्या पिढीसाठी वरदान ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या