Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedत्यांना मी काय म्हणावं..!

त्यांना मी काय म्हणावं..!

अजित दलमीर जमादार,

कविता : त्यांना मी काय म्हणावं…!

- Advertisement -

त्यांना स्त्री म्हणावं

की योद्धा म्हणावं….

त्यांना गरिबांची माय म्हणावं

की रन गाजविणारी रणरागिणी म्हणावं…

ज्यांनी कर्तव्याची जाण जाणिली

त्यांना कर्तबगारणी म्हणावं…

की 400 मैला वर बाळ सोडून कर्तव्य बजावतात

म्हणून त्याग मूर्ती म्हणावं…

आता तुम्हीच सांगा मित्रहो त्यांना मी काय म्हणावं..!

ज्यांनी गरीब बेघर लोकांना घरे मिळवून दिली

त्यांना गरिबांची वाली म्हणावं,….

की स्त्री जनजागृती केली म्हणून

त्यांना आदी नारीशक्ती म्हणावं…

ज्यांनी कोरोना महामारीत रात्र असो वा दिवस खंबीर नेतृत्व केलं

म्हणून त्यांना खंबीर नेतृत्वधारी स्त्री म्हणावं…

की ज्यांनी सोबती कर्मचार्‍यांसाठी मोफत औषधी दिली

म्हणून जाणता राजा सारखी एक जाणती राणी म्हणावं…

आता तुम्हीच सांगा मित्रहो त्यांना मी काय म्हणावं…

त्यांनी कोरोना आपलं वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावलं

म्हणून त्यांना एक योग्य निर्णायक अधिकारी म्हणावं…

की कर्मचार्‍यांशी आपुलकीने वागणारी…

एक परिवारातील आपलीशी जिवलग सदस्य म्हणावं…

त्यांनी मध्यरात्री येणार्‍या

पंचायत राज कमिटीला सामोरे जाऊन सहकार्य केलं

म्हणून त्यांना रन गाजविणारी रणरागिणी म्हणावं .

की मध्यरात्री पण जबाबदारी पाडली व सर्व कर्मचार्‍याचा उत्साह वाढविला

म्हणून कर्तृत्ववान अधिकारी म्हणावं…

आता तुम्हीच सांगा मित्रहो त्यांना मी काय म्हणावं….

आपले कार्य सांगता,सांगता येणार नाही..

ते मी तरी कोणत्या शब्दांत सांगावं…

आज आपलं असं आम्हास सोडून जान

तुम्हीच सांगा याला मनाला कसं पटाव…..

ज्यांचे कार्य नेहमीचं स्मरणात राहतील…

त्यांना सहज कस विसरावं…

आता तुम्हीच सांगा मित्रहो

अशा हृदयस्पर्शी व्यक्तिमत्वास आपण काय म्हणावं….

स्थापत्य अभियंता सहा. पंचायत समिती रावेर

रा.लोहारा ता.रावेर

……………………………………………

- Advertisment -

ताज्या बातम्या