Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदिवाळी अंक २०२० - कविता : आरसा

दिवाळी अंक २०२० – कविता : आरसा

आरसा

माझ्या नितळ मनाला

- Advertisement -

हवा प्रेमाचा आरसा

ज्यात पाहून हसेन

मीच खूपदा फारसा (धृ)

दाट झाडी चोहीकडे

वर मायेचं आभाळ

बसती पाखरे सजून

जसे आहे रे पुष्कळ

उडे आभास ठेवून

त्याचा जपेन वारसा (1)

खोल एकांत वाटतो

कधी कधी अचानक

खूप असता जवळी

जीव तुटतो एकेक

त्याच सोसून भावना

भुले एकेक दिवसा (2)

खूप झाले सोंग आता

नवे मिळावे घरटे

ज्यात मिळेल ममता

आणि वाढेल रोपटे

वाट चालतो सतत

याच शोधाच्या प्रवासा (2)

-आशिष निनगुरकर

- Advertisment -

ताज्या बातम्या