Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedदिवाळी अंक २०२० - कविता : बाजार...

दिवाळी अंक २०२० – कविता : बाजार…

बाजार…

आज खूप दिवसांनी बाजार भरला

- Advertisement -

शेतकरी राजा बघा हा खुश झाला

पिकाला भाव मिळावा हीच ईच्छा

आनंद किती असा बाजार सजला….

किती भारी सगळ्या दुकानांची रांग

ओढ लावतो भाजीपाल्याचा सुगंध

शेव-जिलेबीची खास अशी परंपरा

सगळे मास्क लावूनी फिरे गरागरा…

कोरोनाच्या अशा अवघड काळात

सुरू झाला पुन्हा बाजाराचा संग्राम

गर्दी होणार बघा,गणित पक्के आहे

काळजी घेणे हे आपल्या हाती आहे….

नको त्या ठिकाणी एकत्र येऊ नका

उगाचच त्या गर्दीचा भाग होऊ नका

आपल्यामुळे संक्रमण हे होऊ शकते

चुकीचे असे काही कृपया वागू नका…

बाजारात जाणे जसे हे गरजेचे आहे

तसे नियमात राहणे आवश्यक आहे

कोरोना अजून पूर्णपणे संपला नाही

लस देखील अजून याची आली नाही…

हळूहळू सगळं जसं पूर्वपदावर येतंय

लॉकडाऊनचे अनलॉक आता होतंय

सोशल डिस्टन्स अहो पाळायला हवे

नियमात राहूनच आता जगायला हवे….

आशिष निनगुरकर

घाटकोपर पूर्व,मुंबई – 400075

- Advertisment -

ताज्या बातम्या