Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदेव पाहिलाय का कुणी ?

देव पाहिलाय का कुणी ?

स्वाती त्रिंबक गोसावी

देव पाहिलाय का कुणी नाही ना! अहो पण मग आपण करतोच की देवपूजा दररोज, का करतोय आपण सर्वजण हा देवदेव?

- Advertisement -

हो पण मी पाहिलायं देव………

मी पाहिलायं, आंधळ्याला रस्ता ओलांडून देणारा देव.

मी पाहिलायं, पांगळ्याला व्हिलचेेअवरून इच्छित स्थळी पोहोचवणारा देव.

मी पाहिलायं, अनाथांना मदत करणारा देव.

मी पाहिलायं, आत्महत्या करणार्‍याला वाचवणारा देव.

मी पाहिलायं, काहीही रक्ताचे नाते नसताना, गरजूंना मदत करणारा देव.

मी पाहिलायं, काही वेळेस अनपेक्षितपणे संकटकाळी धाऊन येणारा देव.

मी पाहिलायं, अनाथांची आई सिंधूताई सपकाळांमध्ये देव.

मी पाहिलायं, शिक्षणाची देवता म्हणून काम करणार्‍या सावित्रीबाईंमध्ये देव.

मी पाहिलायं, निरपेक्ष समाजसेवा करणार्‍या अण्णा हजारेंमध्ये देव.

मी पाहिलायं, स्वतः उपाशी असताना दुसर्‍याला घास भरवणार्‍या साधनाताई आमटेंत देव.

मी पाहिलायं, अनेक बेरोजगार व उपेक्षितांसाठी काम करणार्‍या सुधा मूर्तींमध्ये देव.

मी पाहिलायं, शिक्षणाची गंगा घरोघरी आणणार्‍या शाहू महाराजांमध्ये देव.

मी पाहिलायं, दलितांवरील अन्याय व अत्याचाराला तोंड फोडणार्‍या आंबेडकरांमध्ये देव.

मी पाहिलायं, अंधश्रद्धा व रूढी परंपरांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकरांमध्ये देव.

मी पाहिलायं, कामात राम मानणार्‍या वेड्या कुंभारात देव.

मी पाहिलायं, कुष्ठरोगांसारख्या महाभयंकर आजारासाठी काम करणार्‍या बाबा आमटेंत देव.

मी पाहिलायं, दुसर्‍याची सेवा करणार्‍या दयाळू, कनवाळू समाजसेविका मदर तेरेसांत देव.

मी पाहिलायं, करोनाकाळात स्वतः चा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, पोलीस सेवक यांच्या कामात देव.

अहो, मग यापेक्षा काही वेगळा असतो का देव? स्वतःपेक्षा दुसर्‍यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा एक अद्वितीय व्यक्ती म्हणजे देव!

आपल्या मनातील श्रध्दा व विश्वास म्हणजे देव. मनाला शांती मिळवून देणारी पूजा-अर्चा म्हणजे देव.

मी पाहिलायं देव… मी पाहिलायं देव…..

मो. नं. 9421701087

- Advertisment -

ताज्या बातम्या