Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभाकरवडी चाट!

भाकरवडी चाट!

साहित्य : अर्धी/ पाऊण वाटी छोट्या भाकरवड्या, दोन/ तीन चमचे चिंचेची आंबटगोड चटणी

दोन वाट्या मोड आलेले हिरवे मूग, एक टोमॅटो , प्रत्येकी अर्धी लाल पिवळी हिरवी सिमला मिरची, एक चमचा, जिरेपूड, एक हिरवी मिरची, अर्ध्या लिंबाचा रस ,चवीनुसार मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर, भुजिया शेव किंवा मटकी शेव किंवा साधी शेव आपापल्या आवडीप्रमाणे..

- Advertisement -

कृती : भाकरवड्यावर चिंचेची चटणी घालून नीट कालवून बाजूला ठेवून द्या. मूग वाफवून घ्या. मऊ होऊ देऊ नका.थोडे टसटशीत राहायला हवेत.

कांदा,टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची बारीक कापून घ्या.

मिरची कटरमधून काढल्यास बेस्ट. आता वाफवलेल्या मूगात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून त्यावर लिंबाचा रस, मीठ आणि जिरेपूड घालून छान एकत्र करून घ्या.

त्यात चिंचेच्या चटणीत मुरवलेल्या भाकरवड्या घाला, एकत्र करा आणि वर शेव-कोथिंबीर घालून खायला घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या