#DiwaliSpecial : सोनालीचा आवडता स्पेशल डाएट ‘फराळ’!

0
दिवाळीमध्ये सर्वत्र लगबगीचे वातावरण आहे. फराळ करणे, दिवाळीची शॉपिंग, घराची साफसफाई हे सर्व कामे आता जवळपास पूर्ण होत आले आहेत.
दिवाळीची खास अशी आठवण आपल्या सर्वांच्या मनात असते. पण दिवाळी म्हटली की न चुकणारी एक गोष्ट असते ती म्हणजे चवदार फराळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फराळाचे वेध लागलेले असते. मग यामध्ये मराठी कलाकारही त्याला अपवाद नाहीत.
दिवाळी स्पेशलनिमित्त आज तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांच्या घरातील फराळाच्या काही गमतीजमती घेऊन आलो आहोत.
त्यात अभिनेत्री, सोनाली कुलकर्णीने सांगितले आहे की, तिच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणारी आई स्पेशल डाएट फराळ बनवण्याचा प्रयत्न करते.
फराळाविषयी सोनाली कुलकर्णी म्हणते, मला चकली आणि करंज्या करायला खूप आवडतात. दिवाळीत तरी मला फराळ बनवायला आवडतो. करंज्या लाटणेे, त्यात सारण भरून तळणे, या माझ्या आवडीच्या गोष्टी. माझी आजी उत्तम करंज्या करते आणि आई खमंग चकल्या. त्यामुळेच कदाचित मला चकल्या खायला खूप आवडतात. जे खायला आवडतं तेच करण्याकडेही आपला जास्त कल असतो. त्यामुळे आई चकल्या करत असताना माझी लुडबूड असतेच. मी एकटीने कधी दिवाळी फराळ केलेला नाही. पण आई करत असते, तेव्हा मी तिला मदत नक्की करते. मी करत असताना आई समोर असते. त्यामुळेच माझ्या चकल्या किंवा करंज्या मोडत नाहीत. त्यामुळे सुदैवाने माझ्या हातचा मोडलेला फराळ कोणाला खावा लागलेला नाही. माझी आई आजकाल डाएटविषयीचे कुकरी शो पाहते. त्यामूळे यंदा आमच्या घरी डाएट करंज्या आणि डाएट चकल्या बनल्या तर मला नवल वाटणार नाही.

LEAVE A REPLY

*