दिवाळी विशेष : दिवाळीचा रेडीमेड फराळ

0

महागाई आग ओकत असतानाही दिवाळीच्या निमित्ताने घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची जोरदार तयारी घरोघरी सुरू झाली आहे. धावपळीच्या जीवनात घरात दिवाळीचे पदार्थ बनवणे शक्य नसणा-यांसाठी बाजारात विविध प्रकारच्या मिठाई व तयार फराळाची दुकाने सजली आहे. अनेक गृहिनी सध्या फराळ तयार करण्यात व्यस्त झाल्या आहेत.
मिठाई व फराळ बनवण्याची जबाबदारी सर्व साधारणे पणे महिलांची असून काही गृहिणी फराळ व मिठाई ही घरीच बनवणे पसंत करत आहे. पण सर्वच महिलांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही.

म्हणून मिठाईच्या दुकानातील तयार मिठाई व फराळ खरेदी करण्यास पसंती देत आहे. पण फराळ बनवण्यासाठी लागणा-या साहित्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरी मिठाई-फराळ बनवणे हेही सध्या खर्चाचे आहे. दुकानात मिठाई खरेदी करायची म्हटली तर, मिठाईत अनेक प्रकार आहेत. त्यामुळे लोक आपल्या आवडीप्रमाणे मिठाई खरेदी करतात. पण मिठाईच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मिठाई खरेदी करण्याअगोदर विचार करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी तयार फराळाचे स्टॉलवर चिवडा, चकली, शंकर पाळे, शेव, करांजी, अनारासे, बुंदी लाडू, नमकीन, विविध प्रकारचे फराळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. अनेक गृहींनी तयार फराळास पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. यात प्रमुख्याने

दिल्लीगेट, चितळे रोड, माळीवाडा, कापडबाजार, दाळ मंडई, सावेडी, केडगांव, प्रोफेसर कॉलनी आदी भागत हे दुकान लागले असून ग्राहक हळूहळू गर्दी करू लागले आहे.
तसेच कापड बाजार, मार्केट यार्ड,नेता सुभाष चौक, केडगांव, गुलमोहर रोड,प्रोफेसर कॉलनी, सावेडी सह विविध भागात मिठाईची दुकाने सज्ज झाली आहे. यंदा काजूतली, अंजीर बर्फी, आइस हलवा, मावा पेढा, ड्रायफूट्र सह विविध मिठाईना ग्राहकांची विशेष पसंती देत आहे. यंदा या आवडत्या मिठाईच्या किमतीही वाढ झाली आहे. दिवाळीचा सण आहे आणि गोडधोडसाठी मिठाई किंवा फराळ नसेल तर दिवाळी पूर्ण होत नाही.

दिवाळी निमित्त या वर्षी नवनवीन मिठाई तयार करण्यात आली आहे. मलई गुलकंछ, मलई स्टॅडव्हिच, काजू कतली, काजू पान, गजब चॉकलेट, कोकनट, केसरी पेढा, मलई पेढा, केसरी पेढा, आदी सह विविध प्रकारची मिठाई दुकानामध्ये यंदा विक्रीसाठी ठेवली आहे. यंदा ग्राहकांकडून नवनवीन मिठाईला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मात्र साखर, तूप, दुध, मावा, या वर्षी किंमतीत वाढ झाली असली तरी मिठाईच्या किंमती मध्ये कोणतीच वाढ झाली नसल्याचे माहिती महेंद्र पेढेवाल्याचे संचालक लखमीचंद जग्गड यांनी दैनिक नगर टाइम्सला दिली.

तयार मिठाईचे ग्राहकांना आकर्षण
शहरातील विविध भागात असणारी मिठाईच्या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. यात प्रमुख्याने मलई बर्फी काजू कतली, अंजीर बर्फी, मावा पेढा यांना ग्राहक विशेष पसंती देत आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचा-यांना दिवाळीची भेट म्हणून अनेक ठिकाणी मिठाई दिली जात असून यासाठी आतापासून दुकानात ऑर्डर दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

*