दिवाळीची खरेदी जोरात; गिफ्ट कल्चर वाढले; भेटवस्तूंमध्ये वैविध्याचा खजिना

0
नाशिक । दिवाळीचा सण म्हटलं की, स्वत:साठी खरेदी करण्यासह नातेवाईक, मित्रमंडळींना भेटवस्तू दिली जाते. कंपन्या, उद्योग समूह, संस्थाचा कल हल्ली मिठाईपेक्षा भेटवस्तू देण्याकडे वाढला आहे. त्यामुळे भेटवस्तू देण्याचे कल्चर नाशिकमध्ये चांगलेच रुजले आहे. जीएसटीमुळे भेटवस्तूंच्या किमतीत वाढल्या असल्या तरी त्याचा फारसा परिणाम भेटवस्तूंच्या बाजारपेठवर दिसून येणार नाही.

दिवाळीसणाला बाजारात चैतन्य दिसून येते. विजयादमशीनंतर आणि दिवाळीच्या 7 दिवस अगोदर सर्वच दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहतात. याच कालावधीत कंपन्यांचे कर्मचारी, कामगार, चाकरमान्यांचा बोनस बाजारात खुळखुळू लागतो.

कपडे, खाद्यपदार्थ आणि उत्सवासाठी अत्यावश्यक खरेदी केल्यानंतर इतरांसाठी भेटवस्तू देण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे काचेच्या वस्तू कप-बश्यांचे सेट, नॉनस्टिक कुकवेअर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इन्सुलेटेड वस्तू, फायबर आणि स्टिलच्या नित्योपयोगी वस्तू, क्रॉकरी, गृहसजावटीच्या कलात्मक वस्तू, यासह स्टिल डिनर सेट, ब्लेंडर, फू्रट प्रोसेसर, इंडक्शन, ट्रिमर, कॉफी मेकर, ओव्हन, सॅण्डविज मेकर, स्टोस्टर, अशा वस्तू हल्ली भेट म्हणून देण्याकडे कल वाढला आहे.

कंपन्याही आपल्या कर्मचार्‍यांना मिठाईच्या ऐवजी उपयोगीयुक्त वस्तू भेट म्हणून देताना दिसतात. साहजिकच गिफ्ट शॉपमध्ये 35 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अत्यावश्यक वस्तू, कपडे यांची खरेदी झाल्यानंतर ग्राहक इतरांना देण्यासाठी म्हणून अशा गिफ्टला पंसती देतांना दिसतो.

साहजिक दिवाळीपूर्वी 5 दिवस अगोदर भेटवस्तूंच्या दुकानात गर्दी दिसून येते. सण-उत्सवाच्या काळात ग्राहक वस्तू हाताळत खरेदी करण्यासाठी अधिक इच्छुक असतात. परिणामी ऑनलाईन वस्तूंची विक्री करण्यार्‍या ‘अमॅझोन’पोर्टल पेक्षा नजीकच्या ‘गिफ्ट शॉपी’ जाऊन भेटवस्तूंची खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक दिसून येत आहे.

जीएसटीचा परिणाम नाही : दिवाळीत आवश्यक खरेदी झाल्यानंतर ग्राहक गिफ्ट अ‍ॅटमसाठी येतो. सणापूर्वीचे 6-7 दिवस आमच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते. आम्ही गिफ्ट व्हाऊचर, कुपन योजना आणल्या. परिणामी ग्राहकही वाढले.

शिवाय सणानिमित्त भेटवस्तूंवर स्किम, डिस्काऊंट ऑफर्स देत आहोेत. बाजारात मंदी वगैरे काही जाणवत नाही. जो व्यापारी अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याच्याकडे ग्राहकी असतेच. जीएसटीमुळे काही वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असली तरही ‘गिफ्ट कल्चर’नाशिकमध्ये रुजले आहे. हल्ली मिठाईपेक्षा भेटवस्तूं देण्याकडे कल वाढला आहे.
-नितीन मुलतानी
संचालक, सोनी गिफ्टस्

LEAVE A REPLY

*