Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

दीपावली उत्सवादरम्यान अडीच लाख भाविकांनी घेतले साई समाधीचे दर्शन

Share

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – दीपावली उत्सवादरम्यान चार दिवसांत देश-विदेशांतील सुमारे अडीच लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेगा किचनमध्ये दोन लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये म्हणून प्रसंगावधान राखत संस्थानच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी भक्तांना साईराम करीत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

दरम्यान सर्वधर्मीयांचे प्रतिीक असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी दीपावली उत्सवात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी उसळली होती, रविवारी संध्याकाळपासूनच शिर्डी नगरी भाविकांनी फुलून गेल्याने भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली. या कालावधीत जगभरातील सुमारे अडीच लाख साईभक्तांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेगा किचनमध्ये सुमारे दोन लाख भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. 30 ते 35 हजार नाष्टा पाकिटे भाविकांनी घेतली. पीआरओ तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून सशुल्क पासेसद्वारे 34 हजार 712 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.

भाविकांची गर्दी वाढल्याने नंदीगेट काही काळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांची दर्शनासाठी मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून प्रसंगावधान राखून साई संस्थानचे सुरक्षा विभागाचे कर्मचारी यांनी भक्तांना साईराम करीत आपले कर्त्यव्य प्रामाणिकपणे बजावतांना दिसून आले. यावेळी सुरक्षा कर्मचार्‍यांची गावकर्‍यांशी थोडी हुल्लडबाजी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

साईबाबांनी पाण्यावर दिवे पेटविल्याने हा चमत्कार चरित्रात सर्वश्रुत आहे त्यामुळे लेंडी बागेत दीपप्रज्वलन करण्यासाठी महिला वर्गासह आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. दीपावलीच्या निमित्ताने सलग सुट्ट्यांमुळे झालेल्या गर्दीमुळे शहरातील बाजारपेठा खुलून गेल्या होत्या. या गर्दीमुळे शहरातील हॉटेल्स, लॉजिंग, संस्थानचे भक्तनिवास फुल झाल्याचे दिसून आले. दरम्यान पुढील काही दिवस अशीच गर्दी कायम राहील, असा अंदाज येथील व्यावसायिकंानी दिला. संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थांन तसेच शिर्डी पोलीस स्टेशनकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!