Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमधील ऐतिहासिक पाडवा पहाट; व्हिडीओ नक्की बघा

Share

नाशिक | प्रतिनिधी

संस्कृती नाशिक या संस्थेतर्फे आज पहाटे ५ वाजता पाडवा पहाट कार्यक्रमात ख्यातकीर्त गायक ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय गायन पार पडले.

नेहरू चौकातील ऐतिहासिक पिंपळपारावर ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक ओंकार दादरकर यांचे गायन ऐकण्याचा योग जुळून नाशिककर संगीत रसिकांसाठी मेजवानीच ठरली.

नितीन वारे(तबला),सुभाष दसककर(संवादिनी) यांच्यासह पखवाज वर दिगंबर सोनवणे आणि तालवाद्य अमित भालेराव यांची साथसंगत लाभली.

कार्यक्रमाची सुरूवात ब्रम्हवृंदाच्या मंत्रपठणाने झाली. तर सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांना यावर्षीचा संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाशिकची वैभवसंपन्न सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरांची जोपासना करावी व त्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे या उद्देशाने संस्कृती नाशिक या संस्थेची १९९८ मध्ये शाहू खैरे यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आली.

पाडवा पहाट या पहाटेच्या शास्त्रीय सांगीतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सर्वप्रथम आयोजन संस्कृती नाशिक संस्थेने केले. कार्यक्रमाची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आणि गावागावातून या पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन विविध संस्थांनी केले. पाडवा पहाट या कार्यक्रमाची यावर्षी २१ वी मैफल होती.

पाडवा पहाट या कार्यक्रमात आजवर भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, वि. शुभा मुद्गल, पं. मुकुल शिवपुत्र, राजन मिश्रा, सुरेश वाडकर, अश्विनी भिडे चाफेकर, उदय भवाळकर, जयतीर्थ मेवुंडी, रोणू मुजुमदार, कौशिकी चक्रवर्ती, पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर, पं. श्रीनिवास जोशी, गुंदेचा बंधू अशा एकाहून एक दिग्गज गायकांनी आपली कला सादर केली आहे. त्यामुळे या व्यासपीठाला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळालेले आहे.

दिवाळी पहाट

नाशिकमधून 'दिवाळी पहाट' कार्यक्रम #LIVE

Posted by Deshdoot on Sunday, 27 October 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!