कांचीपुरम इडली

0

साहित्य – 2 वाटी उकडलेला तांदूळ , १ वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, पाव चमचा हिंग, १ चमचा काळी मिरी, १ टी. स्पून जीरे, थोडे काजूचे तुकडे, किसलेले आले , चवीपुरते मीठ, कढीपत्ता.

कृती –

तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीपत्ता तळून तेलासकट पिठात घाला.

आले किसून टाकून पीठ खूप फेटावे.एकजीव करावे. पीठ फेटून ईडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात. चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

 

LEAVE A REPLY

*