इटालियन शंकरपाळे – पास्ता चिप्स

0
साहित्य – कणिक १ वाटी , दूध पाऊण वाटी , तूप अर्धी वाटी , मीठ चवीपुरते.  मीठ हे आधी थोडेच घालावे. पास्ता सिझनिंगमध्ये मीठ असते. ओरेगानो सिझनिंग, चिली फ्लेक्स, तळण्याकरता तेल.

 

कृती – दूधात पाणी घालून एक वाटीभर करावे. हे मिश्रण गरम करावे. तूप गरम करून घ्यावे आणि दूध तूप एकत्र करावे. त्यातच पास्ता सिझनिंग, चिली फ्लेक्स आणि मीठ घालावे. मग त्यात मावेल इतकी कणिक घालून फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असे मऊ भिजवून घ्यावे.

सिझनिंग जरा जास्त घालावे लागते कारण तळल्यावर त्याची चव जरा कमी लागते. नेहमीच्या शंकरपाळ्यांप्रमाणे पोळपाटावर जाडसर पोळी लाटून , सुरीनं शंकरपाळ्यांच्या आकारात कापून गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात. टिश्शूवर काढून मग गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भराव्यात.

LEAVE A REPLY

*