राईस क्रिस्पी चिवडा

0
साहित्य – १ डबा राईस क्रिस्पीचा , १ १/२ ते २ टेबलस्पून तेल ,  काजू /शेंगदाणे, चिमूटभर हिंग , १ १/२ चमचा मोहरी २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून , ८ / १० कडीपत्त्याची पाने,  ३ चमचे तीळ , २ चमचे तिखटपूड. (लाल मिरची) ,  १ चमचा हळद , २ चमचे साखर , चवीसाठी मीठ , ३ चमचे जीरे पावडर , ३ चमचे धणे पावडर.

कृती –

एका कढईत तेल गरम करा. त्यात काजू / शेंगदाणे तळून घ्या. त्याच तेलात हिंग, मोहरीची फोडणी करा.

त्यात लगेच हिरव्या मिरच्या व कडीपत्ता टाका. गॅस बंद करून तेलात तीळ टाका (तीळ पटकन जळतात , तसे होऊ नये). एका वेगळ्या भांड्यात फोडणी, राईस क्रिस्पी, काजू/दाणे एकत्र करा. फार ढवळू नका. उरलेले मसाले, मीठ , साखर घाला व हलकेच ढवळा.

LEAVE A REPLY

*