दिवाळीसाठी खास पाककृती : स्वीटकॉर्न ढोकळा !

0

साहित्य –  2 कप स्वीट कॉर्न ,  1 कप ,  1 कप रवा , दही, 1 किसलेलं आलं, इनो पावडर 3/4 छोटे चमचे, 1 लिंबू ,  2-3 टेबल स्पून तेल , मोहरी, कडीपत्ता , हिरवी मिरची , हिरवे धने, चवीनुसार मीठ.

कृती –

सर्वात प्रथम दही फेटून घ्यावे. त्यामध्ये रवा टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. स्वीटकॉर्नला बारीक करून त्याचे क्रीम तयार करून घ्यावे. आता स्वीटकॉर्न क्रीम दही आणि रवा असलेल्या मिश्रणात मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये मीठ, आल्याची पेस्ट आणि लिंबाचा रस टाकून चांगले एकत्र करून घ्यावे.

साधारण 5 मिनिटे झाकून ठेवावे. एका भांड्यामध्ये 2 -2 1/2 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. एका ताटाला तेल लावावे. झाकून ठेवलेल्या मिश्रणात ईनो फ्रूट सॉल्ट मिक्स करून घ्यावे. मिश्रण फुगल्यानंतर हलवणे बंद करावे. मिश्रण एका थाळीमध्ये टाकून पाण्यात ठेवलेल्या स्टॅंडवर ठेवून द्यावे.

साधारण 20 मिनिटे झाकून चांगल्या प्रकारे शिजू द्यावे. वाफ आल्यानंतर गॅस कमी करावा.20 मिनिटांनंतर झाकण काढून चाकून ढोकळा शिजला आहे की नाही पाहावे. त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरीची फोडणी द्या. यामध्ये कडीपता हिरवी मिरची टाकून हलके भाजून घ्यावे. ही फोडणी ढोकळ्यावर पसरवा आणि तुमचा स्वीटकॉर्न ढोकळा तयार.

LEAVE A REPLY

*