दिवाळीसाठी खास पाककृती : ऑरेंज मिल्कशेक

0
साहित्य – चार वाट्या दूध, पाव वाटी साय, दीड ते दोन वाट्या संत्र्याचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस, आठ ते दहा चमचे साखर, बर्फ.

कृती –

गार दूध घेऊन त्यात साखर मिसळून घ्यावी. संत्र्याचा व लिंबाचा रस एकत्र करावा. एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये बर्फाचा चुरा घालावा. त्यात संत्र्याच्या व लिंबाच्या रसाचे मिश्रण घालून दूध ओतावे. ग्लासमध्ये सरबत ओतून त्यावर थोडी साय घालून प्यावयास द्यावे.

LEAVE A REPLY

*