Type to search

दिवाळीचे जागतिक स्वरूप !

Diwali Articles Special

दिवाळीचे जागतिक स्वरूप !

Share

दिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.भारत, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

दिवाळी या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरात दिवाळीचा थाट मांडलेला दिसतो.

भारतीय ध्वज मेलबर्न येथे दिवाळी निमित्त लावला जातो. ऑस्ट्रेलिया मध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये सरकारने एक लाख डॉलर्स या कार्यक्रमाला दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!