शिवतेज प्रतिष्ठानतर्फे ‘स्वराज्यदुर्ग किल्ला बनवा स्पर्धा’

0

सुमारे तीस हजार रुपयांच्या पारितोषिकांसह स्वराज्य दर्शन-छायाचित्र प्रदर्शन

अहमदनगर :  जागतिक स्थापत्यकलेतील वास्तुशैलीची अजोड कलाकृती म्हणजे शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीसाठी बांधलेले गड,किल्ले व दुर्ग होत.किल्ले व दिवाळी यांचे शिवकाळात अतूट नाते होते.मुलांना इतिहासातुन प्रेरणा मिळावी व त्यांच्यातील स्थापत्य अभियंते घडावेत या हेतूने शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने भव्यफस्वराज्यदूर्ग किल्ला बनवा स्पर्धेचेफ आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे स्वराज्यदर्शन हे छायाचित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक रु 11,111,द्वितीय पारितोषिक रु.7,777,तृतीय पारितोषिक रु.5,555 रु.व रु.1,111 ची 5 उत्तेजनार्थ पारितोषिके व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्वराज्यपदक प्रदान केले जाणार आहे.स्पर्धकांनी घरी किल्ले तयार करावयाचे असून 23 ऑक्टो.2017 पर्यंत परीक्षक घरी येऊन किल्ल्यांचे परीक्षण करतील.

हरहुन्नरी कलाकार डॉ.अमोल बागूल,प्रा.किरण घालमे,निवेदक शैलेश थोरात,चित्रकार श्रुती कटारिया आदी स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी पूर्ण पत्ता व मोबाईल नंबरसह सिद्धेश्वर जनरल स्टोअर्स,चंद्रलोक अपार्टमेंट,दिल्लीगेट,अफनगर येथे करावी.

अधिक माहितीसाठी मो.738 5522 622 तसेच मो.8149 933 885 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

किल्ल्याचा आकार, प्रमाणबद्धता, नावीन्यपूर्ण कल्पना,आकर्षकता, रंगसंगती, विविध कलात्मक साहित्याचा वापर, ऐतिहासिक पार्श्वभूमी आदी बाबींचा परीक्षणात समावेश आहे.

LEAVE A REPLY

*