दिवाळी फिवर कायम; उद्याने गजबजली

0
नाशिक । शाळांना दिवाळीच्या सुटया असल्याने शहरातील विविध भागातील महापालिकेची उद्याने गजबजून गेली आहेत. त्यामुळे दिवाळी फिवर कायम असल्याचे दिसून येते. देखरेखीची व्यवस्था चोख नसल्याने काही भागातील ठराविक उद्याने वगळता अनेक उद्यानांची अवस्था कोट़यवधी रुपये खर्च करूनही अतिशय दयनीय अवस्थेत असून ओसाड पडली आहे.

शहरात महापालिकेची सार्वजनिक अशी सुमारे 400 उद्याने आहेत. त्यातील अनेक उद्यान ही केवळ नावाला दिसून येत आहे. शहरातील बहुतेक उद्यांनामध्ये सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची संख्या वाढली आहे. सायंकाळच्यावेळी निसर्गाच्या सानिध्यात आल्हाददायक आनंद मिळावा या उद्देशाने अनेक साठीपार केलेले नागरिक उद्यानात येत असतात.

सध्या प्रमोद महाजन उद्यानात बालगोपाळांची मोठी गर्दी दिसून येत आहे. येथील आर्टिफिशियल वाघ , हत्ती अशा प्राण्यांनी चार चाँद लावले. या उद्यानात चिमुरड्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही विरंगुळा देणारी व्यवस्था असल्याने नागरीक या उद्यानात येण्यासाठी प्रथम पसंती दर्शवतात.

 

LEAVE A REPLY

*