Type to search

आवर्जून वाचाच जळगाव दिवाळी - अनुभव (गावाकडची दिवाळी) दिवाळी - कथा/काव्य दिवाळी - कविता दिवाळी - ग्रहमान - राशीभविष्य दिवाळी - निमित्त दिवाळी - पाककृती दिवाळी - प्रवास वर्णन दिवाळी - प्रेरणा (यशोगाथा) दिवाळी - ब्लॉग दिवाळी - भाऊबीज दिवाळी - वार्षिक भविष्य दिवाळी - विशेष लेख दिवाळी विशेष - रिपोर्ताज

दिवाळी : बी.यू.एन.रायसोनी शिशूविहार शाळेत दिवाळी सेलीब्रेशन

Share

जळगाव । प्रतिनिधी

येथील बी.यू.एन.रायसोनी शाळेत दिवाळी सेलीब्रेशन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी होते.

मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका

सौ.रेखा कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शिशूविहार विभागातील विद्यार्थ्यांनी दीपावलीचा सण उत्साहात साजरा केला. आकर्षक रोषणाई, वातीचे दिवे यांनी शाळा उजळून निघाली.

दिवाळी सेलीब्रेशन कार्यक्रमात शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्व समजावून सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचा आनंद घेत असताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फुलझाड्या, कुंड्या, चक्र पेटवून दिवाळीचा आनंद घेतला. शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना दिप, फुलझडी पॉकीट व कॅडबरी भेट देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिशूविहार विभागातील सौ.अंजली बागुल, सौ.सोनाली बडगुजर, सौ.मनिषा पाटील, सौ.पुष्पा पाटील, सौ.आरती कोळी, सौ.भारती ठाकूर, सौ.सुवर्णा जोशी, सौ.मनिषा काळबैले, शितल बाविस्कर, वैशाली चौधरी यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!