Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बसस्थानक आवारात एक रुपयात बचतगटांना करता येणार फराळ विक्री

Share

नाशिक । परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून एसटीच्या बस स्थानकावर महिला बचत गटांना दिवाळीचा फराळ विक्री करता येणार आहे. बचतगटांना एक रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना आजपासून (दि.2) ते 13 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकीचे भान राखत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांसाठी दिवाळी फराळाच्या विक्रीची दालने एसटी बस स्थानकाच्या मोकळ्या आवारात एक रुपया नाममात्र शुल्क आकारून उभी करण्याच्या उद्देशाने दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना हा स्तुत्य उपक्रम गतवर्षीपासून राबवण्यात येत आहे.

त्याद्वारे महिला बचत गटाच्या उत्पादनांची विक्री होऊन त्यांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन मिळावे, ही किमान अपेक्षा बाळगून दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून यंदा ही योजना 2 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.

एक रुपयात होणार जागा उपलब्ध

एसटी बसस्थानकाच्या आवारात बचतगटांना विक्री दालनामध्ये दिवाळीच्या फराळाचे पदार्थ, पणत्या, कंदील, साबण, उटणे आदी वस्तू बचतगटांना विकता येणार आहेत. त्यासाठी संबंधित बचतगटांनी नाशिक विभागातील विभाग नियंत्रकाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार असून त्यानंतर विक्री दालने उभे करता येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!