वार्षिक भविष्य २०२४ - वृषभ : विवाह इच्छुकांचे विवाह होतील

वार्षिक भविष्य २०२४ - वृषभ : विवाह इच्छुकांचे विवाह होतील

पुरूष - साखरपुडा तुटला आहे. विवाहास विलंब झालेला आहे तर नवीन वर्ष आपले विवाहाचे असणार आहे. या बाबतीत आपणास आपले वडिलांचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वडिलांचे वैयक्तिक कोर्ट कचेरीत काही दावे सुरू असलेस त्यांना विजयाची संभावना अधिक आहे. घरगुती वाटे हिस्से वाटणी ह्या वर्षात होणारी असली तर मनाप्रमाणे हिस्सा प्राप्त होईल. मित्र परिवारबाबत सावध असावे. शक्यतो पैश्यांचे व्यवहार करू नये. या वर्षात कारण नसतांना वादाचे योग आहेत. नातेवाईकांचा हस्तक्षेप टाळावा.

महिला - विवाह इच्छुक मुली, प्रेम प्रकरण सुरू आहेत अशा मुलींना हे वर्ष उत्तम आहे. आपले प्रेमप्रकरण आई वडिलांना माहित नाही तर त्यांना माहिती देण्याचे हे वर्ष उत्तम आहे. इतर विवाह इच्छुकांचे विवाहात काही अडचणी येणार आहेत. याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा. सासरकडील पाहुणे मंडळींचे आगमन होणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपणावर टोमणे मारणे होणार आहे. आपण हे ऐकले न ऐकल्यासारखे करावे. आपली प्रतिक्रिया देवून कारण नसतांना वाद वाढवू नये. पतीस किंवा सासु सासरे यांचेशी पटत नसेल तर उगाचच घटस्फोट पावेतो निर्णय घेवू नये.

नोकरवर्ग - नौकर वर्गाने या वर्षात नौकरीचे कामाबाबत तत्पर रहावे. उगाच दांडी मारू नये. वरिष्ठ अधिकारी वर्गाशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करावा. कमी पगार आहे म्हणून नौकरी सोडण्याचा विचार मनात आणू नका. नवीन वर्षाच्या मध्यंतरानंतर आपली पगारवाढ होईल. अनेक नौकरवर्गास परदेश वारी आपली कंपनी संधी देणार आहे. वर्षाच्या सुरवातीचा काळ हा समस्येचा जाणार आहे. ह्यात मित्रपरिवार मंडळी त्रासदायक ठरणार आहे. उधार उसनवारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. नकार देतांना पण सौम्यतेने नकार द्यावा. नौकरीत वेळेचे बंधन पाळावे.

व्यवसाय - सर्वसाधारण व्यवसाय करतांना खुप मेहनत घ्यावी लागणार. त्यासाठी धावपळ करावी लागणार. परंतु ही मेहनत पुढील दिवसात फारच लाभदायक ठरणार आहे. आपणास ज्या स्टॉकमध्ये नुकसानी होत आहेत, ह्या स्टॉकचा विचार न करता इतर व्यवहार करावे. नुकसानीकारक वाटणारे स्टॉक आपणास पुढील दिवसात लाभ मिळवून देणारे ठरणार आहेत. आपले व्यवसायात वाढ झालेली दिसेल. व्यवसाय वाढ करणेस हा काळ उत्तम आहे. व्यवसाय जागी वर्तमान काळाप्रमाणे नवीन रूप देण्याचा अवश्य प्रयत्न करावा.

विद्यार्थीवर्ग - वर्षातील प्रथम सहा महिने अभ्यासात विचलितपणा आणणारा आहे. अभ्यासात मन लागणार नाही. ह्या काळात आपणास अभ्यासात लक्ष द्यावे लागणार आहे. याशिवाय चुकीचे मित्राच्या संगतीपासून दूर रहावे. अन्यथा ती चुकीची कामे करतील आणि त्याचा आरोप आपल्यावर येईल. सहा महिन्यानंतरचा काळ अत्यंत उत्तम असुन उपयुक्त ठरणार आहे. आपण ह्या काळात ज्या परिक्षा देणार आहात त्यात अधिकाधिक यशाची संभावना नाही. पुढील वर्षाची तयारीत पण अग्रेसर आपण राहणार आहात.

राजकारणी - या वर्षात आपण शक्यतो आपले खाजगी वाहनाने प्रवास करणे टाळावेत. नवीन वर्षातील प्रथम सहा महिनेत आपण कारण नसतांना धावपळ करू नये. ह्या काळात पक्ष बदल आपणास हानीकारक ठरणार आहे. अतिउत्साही कार्यकर्त्यांना नियंत्रणाखाली ठेवावे. यांनी केलेली कृती आपणास राजकारणात चिंताकारक ठरणार आहे. पैश्यांचे व्यवहारात गोपनियता बाळगावी. सहा महिन्यानंतर आपणास राजकारणात राजयोग लाभणार आहे. पक्षातील आपले स्थान वाढणार आहे. नवीन महत्त्वपूर्ण कार्य आपले हाती मिळणार आहे.

आरोग्य - हृदयादी विकार, ब्लड प्रेशर विकार, किडनी, मुलादी विकार बाबत आरोग्याचे समस्या निर्माण होणार आहेत. ह्यासोबत आपण जे काही कार्य करीत आहेत त्यातील उत्पन्न होणारे समस्याचे परिणाम आरोग्यावर होणार आहेत. गर्भवती महिलांनी या काळात अधिकाधिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. ज्या दांपत्यांना टेस्ट ट्युब बेबी करावयाची आहे त्यांनी या वर्षातील सहा महिन्यानंतरच्या काळात करावी. डोक्यावर आघात, घसरून पडणेचा धोका आहे. आपण नेहमी पाण्याच्या जागेपासून सावध असावे. ऑपरेशन शेवटचे वर्षात यशस्वी होतील.

नातीगोती - ह्या नवीन वर्षात नाते संबंधीतांचे वागणे मिश्रीत स्वरुपाचे असणार आहे असे असतांना आपण आपले व्यवहार नाते संबंध बाबत चांगलेच ठेवावे लागणार आहे. कारण आपण अविवाहीत असाल अथवा आपली मुले मुली अविवाहीत असतील त्यांचे विवाह ह्याच नाते संबंधातून ठरण्याची संभावना आहे. ह्याच नाते संबंधामुळे आपणाकडे मंगल कार्य संपन्न होणार आहेत. ह्या वर्षाचे सहामाही नंतर आपले घरात पाहुणे मंडळींची वर्दळ राहणार आहे व ह्याशिवाय त्यांचेसोबत प्रवास देखील करावा लागणार आहे.

आर्थिक - वर्षाचे प्रथम सहामहिनेचा काळ हा समस्त वृषभ राशी व्यक्तींना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल. कर्ज काढण्याचे प्रसंग येतील आहे. आपली काही उसनवारी उधारी असल्यास त्या वसुलीत अडचणी येतील. नाते संबंधीताकडे असल्यास एका शब्दाने पण बोलता येणार नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. ह्या वर्षाच्या सहामाहीनंतर बरेचसे आर्थिक समस्या कमी होणार आहेत. कर्ज समस्यांचे पण प्रश्न मार्गी लागतील. ह्या काळात आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. मुल्यवान वस्तु सोने-चांदीचे दागिने खरेदी कराल.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com